शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प प्रेरणातून शेतक-यांना ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात ...

ठळक मुद्देसमुपदेशन : आरोग्य सेवा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१७ मध्ये एकूण ३७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्याचे प्रमाण लक्षात घेता, त्यांना मानसिक बळ देऊन जगण्याच्या प्रेरणेसाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत ‘प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन’ आरोग्य सेवा कार्यक्रम राबविला जात आहे.मानसिक दडपणाखाली जीवन जगताना आत्महत्येसारखे विचार मनात येतात. अशा व्यक्तीचे वेळीच समुपदेशन व उपचार केल्यास त्यास आत्महत्येपासून दूर करता येते. यासाठी शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प समुपदेशन कार्यक्रम राबविला जात आहे. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत एकूण ३ हजार ५६४ जणांच्या भेटी प्रकल्पाद्वारे घेतल्या. या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले असून त्यांना औषधोपचार दिले. आशा वर्कर व प्रकल्प प्रेरणा यंत्रणेमार्फत सध्या शेतकरी कुटुंबांच्या भेटींचे नियोजन केले जात आहे. परंतु सदर कामे करताना स्वतंत्र वाहनच उपलब्ध नाही. वाहन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. बाह्यसंपर्कातील १ हजार १५७ तसेच १ हजार ९९५ जणांचे संबंधित यंत्रणेमार्फत समुपदेशन करण्यात आले आहे.