शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:35 IST

उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : औरंगाबादजालना या दोन दुष्काळी जिल्ह्यांतील कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

अगोदर या योजनेतून वीज जोडणी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा (१५ आॅगस्ट) मुहूर्त शोधला होता. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातूनच या योजनेचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात मात्र, अजूनही ११ केव्ही ही उच्चदाब वाहिनीच वावरापर्यंत पोहोचलेली नाही. यासंबंधीची कामे करण्यासाठी कंत्राटदार निश्चित झालेले नाहीत. ही योजना राबविण्यासाठी महावितरणला सलग तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली. निविदांमधील दरसूची ही परवडणारी नसल्यामुळे कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळत नाही. त्यामुळे आता महावितरणने या योजनेसाठी प्रजासत्ताक दिनाचा (२६ जानेवारी) मुहूर्त तरी साधावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, हे विशेष!

३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या जिल्ह्यातील ९ हजार २१४ तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीज जोडणी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मागील ७ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत. या योजनेंतर्गत एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन किंवा तीन कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. वीज चोरीपासून सुटका होणार आहे. या योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात १६८ कोटी ८ लाख रुपये, तर जालना जिल्ह्यात १८३ कोटी ८८ लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत.

मात्र, या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरच कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे जुलैपासून तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. निविदांमधील विद्युत साहित्यांचा दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी या योजनेच्या कामांवर राज्यभर बहिष्कार टाकलेला आहे.

उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदेसध्या ६५ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. सध्या सर्रासपणे आकडे टाकून कृषिपंपांना विजेचा वापर केला जातो. आता यापुढे उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून कृषिपंपांना वीज चोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीत एका रोहित्रावरून दोन किंवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होईल. उच्चदाब प्रणालीमुळे वीज हानीसुद्धा कमी होणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादJalanaजालना