उमरी : पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या शेतकरी दिन कार्यक्रमात तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले़ कृषी कार्यालयाच्या गलथान कारभाराबद्दल शेतकऱ्यांनी सर्वांसमक्ष खडे बोल सुनावले़जि़प़सदस्य मारोतराव कवळे यांच्या अध्यक्षतेखाली व पं़ स़ सभापती शिवाजीराव देशमुख तळेगावकर, युवा नेते शिरीषराव गोरठेकर, जि़प़ सदस्य रमेश सरोदे, सुभाषराव गोरठेकर, मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली़ प्रारंभी पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले़ यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत उमरी येथील शेतकरी बाबू पांचाळ म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांसाठी हायटेक कृषी मंडळ स्थापन केले, मात्र कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला कसलेच सहकार्य केले नाही़ राम कप्पावार (तळेगाव) या शेतकऱ्याने तळेगावसाठी आलेली शेती अवजारे वाटपात कसलेच नियोजन नसल्याचे सांगून कुणीही गोदामातून अवजारे उचलून नेत आहेत व त्याची भंगारात विक्री करीत असल्याचे सांगितले़ शिरीषराव गोरठेकर यांनीही कृषी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले़ वाटपासाठी आलेली बियाणे पडून राहते़ वाटप होतच नाही़ ग्रिन हाऊस, पॅक हाऊस गरजूंना मिळत नाही़ गोरठा येथे ३०० सायकल कोळपे व ३ वर्षांपासून पडून आहेत़ पाणलोट क्षेत्रविकास अंतर्गत एनजीओंकडे कामे दिली़ दीड कोटींची कामे गोरठा भागात झाल्याचे ते सांगतात़ आपण स्वत: पाणलोट समितीचे अध्यक्ष असूनही ही कामे कुठे केली़ त्यावर खर्च किती झाला याची माहिती मिळत नाही़ पाणलोट समिती अध्यक्षांची तालुकास्तरीय बैठक एकदाही झाली नाही़ या सर्व प्रकाराची सत्यता तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर येऊ द्या, अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर यावे लागेल असा इशारा दिला़ तालुक्यातील पाणलोट समिती अध्यक्षांची एक बैठक तालुका कृषी कार्यालयात झाली़ यावेळी फक्त ५ अध्यक्ष उपस्थित होते़ पुन्हा एक बैठक लवकरच घेऊ, त्याची माहिती देण्यात येईल़ यापुढे चुका सुधारण्यात येतील, असे तालुका कृषी अधिकारी मोहम्मद फारुख यांनी सांगितले. यावेळी सुभाषराव गोरठेकर यांनी शेतकऱ्यांची मूलभूत समस्या असलेले माती परीक्षणाची येथे कसलीच सोय नसल्याची तक्रार केली़ यावेळी जि़प़सदस्य कवळे, रमेश सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले़ गणेशराव कौडगावकर, प्रभाकर पुयड, आनंदराव यल्लमगोंडे, रामखडकचे सरपंच आनंदराव जाधव, विष्णू पंडित, गोविंदराव पवळे, आनंदराव मोरे, साहेबराव शिंदे, शंकर पाटील भायेगावकर, प्रशांत पिन्नलवार, दिगंबर जगताप आदी शेतकरी उपस्थित होते़ सूत्रसंचालन व प्रास्ताविक पं़स़चे कृषी अधिकारी पठाण यांनी केले़ मोरे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)शेतकऱ्यांचा माहुरात सत्कारश्रीक्षेत्र माहूर : पद्मश्री डॉ़ विखे पाटील यांच्या जन्मदिनी माहूर तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी सभापती अनुसयाताई राजूरकर, तालुका कृषी अधिकारी विजय चन्ना, कृ़अ़ जी़एऩ हुंडेकर, तंक़ृ़अ़ सचिन पांचाळ, देवकुमार पाटील, अंबादास राजूरकर, मंचकराव देश्मुख, अविनाश टनमने, प्रवीण बिरादार, नामदेवराव कातले, रामकृष्ण लसंते, रामचंद्र डुकरे, वामनराव पडलवार, संदीप पडलवार, लिलाबाई खराटे, विनायक देशमुख आदी उपस्थित होते़ कार्यक्रमास भावनाताई कटकमवार, खुर्शीदाबी मुमताजबानो, व्ही़आऱ ठाकरे, विनोद कदम, आऱजी़ चेरेकर, नितीन चव्हाण, जी़एऩ गिरीवंशी, शंकर पवार, वाय़वाय़दळवी, अरूण काळे, संदीप पोतगंटवार, एस़जी़ मेश्राम, एस़व्हीख़ंदारे, भारत जाधव, किशोर महल्ले, गोपाल उपलेंचवार, लक्ष्मण धुले, राजेश दीक्षित, अमोल शिंदे, विनित पाटील, विनायक कुटे, योगेश डाखोरकर उपस्थित होते़ (वार्ताहर)कासारखेडा येथे कृषी दिन साजरामालेगाव : कासारखेडा ग्रामपंचायतमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच संध्या सूत्रधारे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच चंद्रकला बाऱ्हाटे, मुंजाजी बाऱ्हाटे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश शिंदे, शंकरराव शिंदे, चंद्रशेखर शिंदे, गोपाळ आढाव, किशन बाऱ्हाटे, भीमराव हिंगोले, होनाजी हिंगोले, धाराजी आढाव, ग्रामसेवक एस. बी. येवते, कृषी सहाय्यक बादलवार यांचीे उपस्थिती होती. (वार्ताहर)नायगावात कार्यक्रमनायगाव बाजार : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आ. वसंतराव चव्हाण, जि.प. सदस्य संजय बेळगे, तालुका कृषी अधिकारी अे.आर. यमलवाड, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.पळसापळसा : येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कांताबाई मुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच उत्तमराव कांबळे, माजी सरपंच टी.जी. घंगाळे हे होते. शेतकरी दिनाविषयी मार्गदशर््न कृषी सहा. राहुल दराडे, एस.व्ही. कऱ्हाळे, जी.आर. पडलवार व कृषी पर्यवेक्षक पी.टी. हलालपुरे यांनी केले. कार्यक्रमास सतीश मुळे, शिवाजी मस्के, अशोक जाधव, चंपत घंगाळे, माजी सरपंच बालाजी मस्के, ज्ञानेश्वर गिरी, चंपत निलेवार, राजाराम वालगोटेवाड, बन्सी घंगाळे, दत्ता गंगासागर, पांडुरंग महाराज, जिजाबाई बर्वे, कलावती चव्हाण, गजानन श्रीमंगले, विठ्ठल थोरात हे उपस्थित होते. सूत्रसंचालन वार्ताहर शंकर मुळे यांनी केले. (वार्ताहर)
कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले
By admin | Updated: August 31, 2014 00:15 IST