उद्धव चाटे, गंगाखेडयंदा तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांंनी खरीप पिकांची नुकसान भरपाई मिळावी, या आशेवर तब्बल २ कोटी १८ लाख ६९ हजार ३३८ रुपयांचा पीक विमा काढला आहे. गंगाखेड तालुका गेल्या तीन ते चार वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला जात आहे. गतवर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता, अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी निसर्गासमोर हार न मानता खरिपाची पेरणी केली होती. परंतु निसर्गाला हे मान्य नव्हते की, काय? पावसाने दांडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली. सध्या शेतकरी डोक्यावर पाणी आणून कपाशीची पिके जगविण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत आहेत. निसर्गावर अवलंबून असलेले खरिपाचे पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीक विमा काढण्यासाठी बँकेमध्ये गर्दी केली होती. तालुक्यात ३७ हजार ७४८ शेतकऱ्यांनी २ कोटी १८ लाख ६९ हजार ३३८ रुपयांचा पीक विमा उतरविला आहे.
शेतकऱ्यांनी सव्वादोन कोटी पीक विमा भरला
By admin | Updated: August 13, 2014 00:22 IST