देवणी : देवणी तालुक्यातील शेतकर्यांनी आगामी खरीप हंगामात सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी. ए. सावळे यांनी केले आहे. सोयाबीनच्या राशी होत असताना पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे बीजोत्पादन कार्यक्रमात आलेल्या व्यत्ययामुळे आगामी खरीप हंगामात पूरक सोयाबीन बियाणे बाजारात येणे अवघड असल्याने शेतकर्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे पेरावे, असे सांगताना तालुका कृषी अधिकारी सावळे म्हणाले की, प्रमाणित असलेले बियाणे पेरणीसाठी खरेदी केल्यानंतर सलग तीन वर्षापर्यंत ते बियाणे पुन्हा पेरणीसाठी वापरात आणता येते. मात्र अशा बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरी प्रायोगिक तत्वावर तपासून खात्री करूनच हे बियाणे पेरणीसाठी वापरणे योग्य होईल, असेही सावळे यांनी सांगितले. (वार्ताहर) सोयाबीन क्षेत्रात वाढ होणाऱ़़ शंभरपैकी ७० बियाणांची उगवण झाल्यास असे बियाणे एकरी २५-२६ किलो वापरावे, असे सांगून गतवर्षी १७ हजार हेक्टरवर तालुक्यात सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असून, पूरक बियाणे बाजारात न आल्यास घरगुती बियाणे वापरण्यास हरकत नसल्याचे सावळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
खरिपासाठी शेतकर्यांनी घरगुती बियाणे पेरावेत
By admin | Updated: May 7, 2014 00:19 IST