शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली

By admin | Updated: March 10, 2017 00:17 IST

सिरसाळा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वरखेलसारख्या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी माधुरी शामसुंदर सोन्नर आता कर सहायक म्हणून ओळखली जाणार आहे.

ग्ाणेश देशमुख  सिरसाळाऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वरखेलसारख्या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी माधुरी शामसुंदर सोन्नर आता कर सहायक म्हणून ओळखली जाणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एनटीसी प्रवर्गातून राज्यात पहिली येण्याचा मान माधुरीने पटकावला आहे.वरखेल हे परळी तालुक्यातील सिरसाळ्यापासून जवळच असलेले अवघ्या ३०० उंबरठ्याचे गाव. आई-वडीलांचा व्यवसाय शेत. वडील शामसुंदर यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर कुटुंबाची उपजीविका चालत नसल्याने त्यांनी गाव सोडून मुंबई गाठली. माधुरीच्या आईने मग शेतीकडे लक्ष दिले. वडिलांनी मुंबईत काम करून माधुरीसह एका मुलीचे व मुलाचे शिक्षण पूर्ण केले. मुलीला वकिलीचे शिक्षण दिले, तर मुलगा इंजिनिअरिंग करतोय.वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन शिकविले, याची माधुरीला जाणीव होती. तिनेही रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास केला. याच अभ्यासाच्या जोरावर तिने राज्य सेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कर सहायक परीक्षेत यश संपादन करून आई-वडिलांसोबतच जिल्ह्याचीही मान उंचावली.महिला दिनाच्या दिवशीच ही शुभवार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली अन् तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.