शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेती क्षेत्रात काळानुसार बदल न झाल्यानेच शेतकऱ्यांच्या मुलांचा शेतकरी होण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:52 IST

पैठण : अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पैठण : काळानुसार शेतीत बदल न झाल्याने शेतकºयाचा मुलगा शेतकरी होण्यास नकार देत आहे, असे प्रतिपादन कवी इंद्रजित भालेराव यांनी अ.भा. पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारपासून दोनदिवसीय मराठी शेतकरीसाहित्य संमेलनास येथील माहेश्वरी भक्त निवासात सुरुवात झाली. यावेळी जालिंदर आडसूळ, कैलास तवार, गीता खांडेभराड, राजेश राजुरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. सतीश बोरुळकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, मनीषा रिठे (वर्धा) आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना इंद्रजित भालेराव यांनी शेतकºयांचा प्रश्न साहित्यात का आला नाही, वकिलाचा मुलगा वकील, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, उद्योजकाचा मुलगा उद्योजक होतो, मात्र शेतकºयाचा मुलगा शेतकरी होण्यास का तयार नाही, याचे कारण म्हणजे शेती पारंपरिक राहिली. तंत्रज्ञानाचा स्वीकार शेतीने केलाच नाही. याच कारणाने शेतीकडे शेतकºयाचा मुलगा वळण्यास तयार नाही. ग्रामीण भागात दुष्काळ असून अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण होते. यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो, तसेच गावात शेती कशी चाललेली आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.या संमेलनात शेतकºयांना शेतीविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली. तसेच तळागाळातील शेतकºयापर्यंत संमेलनाचे उद्दिष्ट व त्याची माहिती पोहोचविण्यासाठी संमेलनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळ रूप धारण केले आहे. तसेच शेतकºयांच्या समस्यांवर उपाययोजना शोधण्यासंदर्भात शासकीय आणि राजकीय आघाड्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. समाजाचा आरसा समजल्या जाणाºया साहित्य क्षेत्रातसुद्धा परिस्थिती वेगळी नसल्याने साहित्य क्षेत्रातील शेती प्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून, या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या पाठीमागे आहे, असे अ‍ॅड. सतीश बोरूळकर यांनी सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यFarmerशेतकरी