तुळजापूर : ‘आमच्याकडे कमावर का येत नाही’ असा जाब विचारत एका शेतमजुरास टिकावाच्या दांड्याने जबर मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी एकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास मंगरूळ (ता़तुळजापूर) येथे घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील अंगद तुकाराम लोहार (वय-७६) हे बुधवारी रात्रीच्या सुमारास स्वत:च्या घरी चिंचेचे माप घेत होते़ त्यावेळी तेथे आलेल्या अनिल धर्मराज लबडे (रा़मंगरूळ) यांनी ‘आमच्याकडे कामावर का येत नाही’ असा जाब विचारत टिकावाच्या दांड्याने अंगद लोहार यांच्या डोक्यात जबर मारहाण केली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लोहार यांचा जागीच मृत्यू झाला़ याबाबत मयताचा मुलगा संजय अंगद लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल लबडे यांच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़ अधिक तपास सपोनि पोवार हे करीत आहेत़ (वार्ताहर)
शेतमजुराचा खून
By admin | Updated: April 15, 2016 00:48 IST