शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; मराठवाड्यात एकाच दिवसात चार तरुण शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 6:18 PM

शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. 

ठळक मुद्दे शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी केल्या आत्महत्या

मराठवाडा : शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. 

पावसाचे प्रमाण जास्त असो कि कमी शेतक-यांच्या मागची कर्जाची आणि नापिकीचे चक्र काही सुटता सुटत नाही. याचीच प्रचीती सातत्याने होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्येमुळे येत आहे. सरकारने नुकतीच शेतक-यांना कर्जमुक्ती जाहीर केली असून त्या रकमेचे वितरणही सुरु झाले आहे. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.  आज मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

परभणी - पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील बाळासाहेब रणेर या ३२ वर्षीय उच्चशिक्षित शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला ३ एकर जमीन होती व त्याच्या नवे राष्ट्रीयकृत बँकेचे १ लाख ८० हजार इतके कर्ज होते. 

बीड -पाटोदा तालुक्यातील लिंबादेवी ऊखंडा येथील अडाले वस्तीवरील राहणा-या बाळासाहेब महादेव जाधव या ३२ वर्षीय शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांच्या नावे बँकेचे कर्ज असून त्यांना ४ एकर जमीन होती.  

नांदेड - लोहा तालुक्यातील पिंपळगाव (ढगे) येथील 38 वर्षीय शेतकरी तुकाराम माधव कापसे या शेतक-याने आज सकाळी आपल्याच शेतात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. २ एकर ६ गुंठे जमीन असलेल्या कापसे यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

 

उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे हातचे खरीप पीक वाया गेल्याने व बँकेकडे कर्जासाठी अर्ज करूनही त्याचे वितरण न झाल्याने लांबाजी डाकवाले या ४२ वर्षीय शेतक-याने आज सकाळी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. डाकवाले यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला आहे. यापूर्वीच त्यांनी आर्थिक विवंचनेने त्रस्त होत आपली जीवनयात्रा संपवली.