शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिक कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्याने बँकेतच केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:48 IST

: पिक कर्जाच्या मंजुरीस दिरंगाई होत असल्याने पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने बॅंकेतच विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली.

औरंगाबाद : पिक कर्जाच्या मंजुरीस दिरंगाई होत असल्याने पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने बॅंकेतच विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली. मधुकर  सुदाम  आहेर  (४८ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, मधुकर आहेर यांनी विहामाडंवा येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पिक कर्जासाठी अर्ज केला होता. त्याच्या मंजुरीस दिरंगाई होत होती. यावर माहिती घेण्यासाठी ते शाखा व्यवस्थापकाकडे गेले असता त्यांच्या कडून मिळालेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. यानंतर त्यांनी रागाच्या भरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास बँकेतच विषारी द्रव्य प्राशन केले. बँकेतील नागरिकांनी त्यांना विहामाडंवा  प्राथमिक  आरोग्य केंद्रात  उपचारासाठी नेले असता त्यांना पाचोड येथील ग्रामीण रूणालयात उपचारासाठी दाखल करावे असे सांगण्यात आले. पाचोड येथील रुग्णालयात आहेर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रूणालयात पुढील उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, आहेर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी बँकेत एकच गर्दी केली. घटनेची नोंद पाचोड  पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून बँकेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहेत. 

जास्त कर्जाची मागणी होती आहेर यांनी यापूर्वी बॅकेकडून  कर्जे  घेतले होते. त्याची ९ हजार बाकी त्यांच्याकडे होती. याबाबत ४ हजार रुपये भरून तडजोड करून त्यांना २० हजाराचे कर्ज देण्यात येणार होते. मात्र त्यांची जास्त रक्कमेची मागणी होती. त्यांना याबाबत चर्चेसाठी आज बोलाविण्यात आले होते. मात्र येथे येताच त्यांनी हा प्रकार केला.- राम पूनित मिश्रा, बॅंकेचे मॅनेजर  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याCrop Loanपीक कर्जbankबँक