शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

उरलेल्या तुरीचे आम्ही करायचे काय? औरंगाबादच्या शेतक-यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:44 IST

शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला. आधीच हंगाम संपत आलेला असताना शासनाने तूर खरेदी सुरू केल्यामुळे नाराज शेतक-यांनी ‘आता आम्ही उरलेल्या तुरीचे करायचे काय?’ असा सवाल करत रोष व्यक्त केला.जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘नाफेड’च्या वतीने शनिवारी (दि.३) तूर खरेदीला सुरुवात झाली. शासनातर्फे यंदा बोनससह प्रतिक्विंटल ५४०० रुपये हमीभाव दिला जात आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सोमवारी संतोष भवर हे शेतकरी केंद्रावर ११ क्विंटल तूर विक्री करण्यास घेऊन आले. मात्र, शासनाच्या आदेशानुसार त्यांची केवळ तीन क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.असाच अनुभव इतर शेतक-यांनाही आला. त्यांनी केंद्रावरील अधिका-यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे सोमवारी केवळ १६५ क्विंटल तूर खरेदी झाली़‘शासन जर पूर्ण तूर खरेदी करणार नसेल तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे? फेकून द्यायची?’ अशा शब्दांत शेतक-यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. अडत बाजारामध्ये तुरीला ४१०० ते ४३०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे व्यापा-याला तूर विक्री केल्यानंतर शेतक-यांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे ते नाराज झाले आहेत. ‘हमीभावाने तूर खरेदी केली’ केवळ एवढेच दाखविण्यासाठी हे सुरू आहे. उरलेली तूर व्यापा-यांकडेच जावी हाच सरकारचा डाव असल्याचा आरोप शेतक-यांनी केला.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त भाव जाहीर केल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, एकरी दोन क्विंटल तूर खरेदीच्या शासन धोरणाने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘केंद्रावर चाळणी यंत्र असतानाही आम्हाला खाजगी व्यावसायिकांकडून चाळून आणण्यास सांगितले जाते. त्यासाठी प्रतिक्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो, असा तक्रारींचा पाढाच शेतक-यांनी मांडला.