शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

२० जानेवारीपर्यंत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर

By admin | Updated: January 16, 2015 01:09 IST

लातूर : जिल्ह्याला १०१ कोटी २ लाख रुपयांची दुष्काळी मदत मिळाली असून, अद्याक्षरानुसार गावांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. प्रथम अद्याक्षरानुसार पहिल्या गावाची निवड होईल.

लातूर : जिल्ह्याला १०१ कोटी २ लाख रुपयांची दुष्काळी मदत मिळाली असून, अद्याक्षरानुसार गावांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. प्रथम अद्याक्षरानुसार पहिल्या गावाची निवड होईल. ते गाव पूर्ण झाल्यानंतर त्याखालील अद्याक्षरानुसार गावांची निवड होईल व सातबारानुसार मदतीचे वाटप केले जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने अद्याक्षरानुसार गावांच्या याद्या करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार मदतीचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील ९४३ गावांतील अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.या सर्व गावांतील शेतकऱ्यांना सातबारावर नोंद असलेल्या पिकांनुसार मदत होईल. शासनाने १०१ कोटी २ लाख रुपये दिले असून, गरज भासल्यास आणखीन मदत मिळणार आहे. सव्वाचार लाख शेतकऱ्यांचे ६ लाख २१ हजार हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ४ हजार ५००, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी ९ हजार आणि फळ पिकांखालील जमिनीसाठी हेक्टरी १२ हजार रुपये तर अल्पभूधारकांना म्हणजे १० गुंठे अर्धा एकर असलेल्या शेतकऱ्यांसाठी १ हजार रुपये मदत देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सातबाऱ्यांचे अवलोकन महसूल प्रशासनाकडून सुरू आहे. सव्वाचार लाख शेतकऱ्यांना या सूत्रानुसार २० जानेवारीपर्यंत मदत खात्यावर जमा केली जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विश्वंभर गावंडे यांनी दिली. (प्रतिनिधी)