शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

फरहत परवीनची गुणवत्ता अडकली गरिबीच्या फेऱ्यात

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

हदगाव : घरात अठराविश्वे दारिद्र्य. खायचीही भ्रांत नाही, अशाही परिस्थितीवर मात करुन नाव कमाविणारे फार कमी आहेत. यात रजानगर, हदगावच्या फरहत परवीन शेख हिचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

सुनील चौरे । लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : घरात अठराविश्वे दारिद्र्य. खायचीही भ्रांत नाही, अशाही परिस्थितीवर मात करुन नाव कमाविणारे फार कमी आहेत. यात रजानगर, हदगावच्या फरहत परवीन शेख हिचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दहावीत तिने ९५ टक्के गुण मिळविले, आता मात्र पुढील शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने तिची गुणवत्ता गरिबीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिला सामाजिक वा दानशूर मंडळींच्या आधाराची आवश्यकता आहे. रजानगर भागात गुलाब शेख यांचे कुटुंबिय राहते. केवळ पाच हजार रुपये प्रतिमाह मानधनावर गुलाब शेख आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. साध्या मेणकापडाच्या घरामध्ये कुटुंब राहते़ घरात वीज नाही, टीव्ही नाही़, मोबाईल नाही़ विज्ञान युगाचे वारे सर्वत्र वाहत असताना या कुटुंबाकडे भौतिक सुखाची कोणतीच व्यवस्था नाही़ वडील मशीदमध्ये कुराण (पोथी) वाचण्याचे काम करतात़ लहान मुलांना जीवनात उसंत मिळावी म्हणून वयस्क माणसाच्या समस्येचे समाधान करण्याचे काम ते दिवसरात्र करीत असतात़ त्यासाठी महिन्याकाठी चार-पाच हजार रुपये त्यांना मिळतात़ अशा बिकट परिस्थितीमध्ये लक्ष्मीचा वास नसणाऱ्या कुटुंबाकडे सरस्वती प्रसन्न झाली़ दहावीच्या परीक्षेत फरहत ९५ टक्के गुण घेईल, याची पुसटशीही कल्पना गुलाब शेख वा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना नव्हती. दहावीच्या निकालानंतरच या मुलीची गुणवत्ता मोहल्ल्यासह शाळेला कळाली़ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गुलाब शेख यांनी फरहत हिचे पुढील शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र चिखलात कमळ फुलावे, त्याप्रमाणे फरहत गुणवत्तेने उजळली. निकाल लागल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला़ मात्र खऱ्या अर्थाने तिच्या खडतर जीवनाचा प्रवास आता सुरु होणार आहे.कारण ११ वी विज्ञानला प्रवेश घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. कुठे पाच हजार तर कुठे सात हजार बिल्डींग फंड म्हणून प्रवेशासाठी घेतले जात आहेत़ त्यानंतर ट्यूशनसाठी एका विषयाला पाच हजार याप्रमाणे चार विषयांचे २० ते ३० हजार रुपये, शालेय साहित्य तिने आणायचे कुठून, असा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे़