शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

अमेरिकेतील प्रसिद्ध आंबा औरंगाबादेत; हिमायत बागेत लगडलेत टॉमी अँटकिन्स ऊर्फ लिली आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 12:36 IST

The famous mango from USA is in Aurangabad; अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील हा टॉमी अँटकिन्स आंबा युरोपात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देइंडो-इस्राईल कृती आराखड्यांतर्गत हिमायतबागेत २०१४ मध्ये सात हेक्टरवर विदेशी आंब्यांची लागवड करण्यात आली होतीएकीकडे सर्व हिरव्या पिवळ्या रंगातील अवीट गोडीचे आंबे आणि त्यात हा लालबुंद आंबा म्हणजे काही औरच दिसतो आहे.

औरंगाबाद : निजामकालीन हिमायत बागेतील आमराईत अमेरिकेतील प्रसिद्ध टॉमी अँटकिन्स आंबा आपल्या लालबुंद रंगामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विदेशी सफरचंद जसे चकचकीत असतात तसाच चकचकीतपणा या अमेरिकन आंब्याला आहे. एकीकडे सर्व हिरव्या पिवळ्या रंगातील अवीट गोडीचे आंबे आणि त्यात हा लालबुंद आंबा म्हणजे काही औरच दिसतो आहे.

मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील हा टॉमी अँटकिन्स आंबा युरोपात प्रसिद्ध आहे. त्यातही विशेषतः लंडनमध्ये या आंब्याला जास्त मागणी असते. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, इंडो-इस्राईल कृती आराखड्यांतर्गत हिमायतबागेत २०१४ मध्ये सात हेक्टरवर विदेशी आंब्यांची लागवड करण्यात आली होती. विविध जातीचे १८०० रोप तयार केले होते. इस्रायलमध्ये प्रतिहेक्टर आंब्याची उत्पादकता २५ टन आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात चार, पाच टन एवढीच आहे. यामधील तफावत दूर करून उत्पादकता वाढवण्यासाठी केशर आंबा केंद्रात संशोधन करण्यात आले. इस्रायलच्या विकसित तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर करण्यात आला. त्यात माया, लिली, टॉमी अँटकिन्स, केन्ट, आम्रपाली, पामर या आंब्याच्या जातींची केशर आंब्याच्या जातीसोबत तुलना करण्यात आली होती. हा टॉमी अँटकिन्स आंबा यंदा झाडाला लगडला आहे. दिसायला अमेरिकेतील हुबेहूब आंबा असला तरी मात्र जमीन, हवामान याचा फरक आंब्यावर होतोच. यामुळे चवीत व सुगंधामध्ये फरक येतोच. पण या आंब्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

लिली नावाने विक्रीअमेरिकेतील या लालबुंद आंब्याची येथे ‘लिली’ नावाने विक्री केली जात आहे. लाल गडद रंग असल्याने जरा हटके दिसतो.- सुनील सलामपुरे, कंत्राटदार

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादUnited Statesअमेरिकाagricultureशेती