शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

४८ आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:18 IST

जिल्ह्यातील ४८ शेतक-यांच्या कुटुंबांना अद्याप प्रशासकीय मदत मिळालेली नाही. त्या कुटुंबियांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने २८ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरविल्या असून, २० आत्महत्यांची प्रकरणे चौकशीच्या कचाट्यात अडकली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील ४८ शेतक-यांच्या कुटुंबांना अद्याप प्रशासकीय मदत मिळालेली नाही. त्या कुटुंबियांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने २८ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरविल्या असून, २० आत्महत्यांची प्रकरणे चौकशीच्या कचाट्यात अडकली आहेत. मराठवाडा २०१२ पासून निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाई झाली. शेतीचे उत्पन्नही घटले. परिणामी शेतक-यांवरील कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यातून आत्महत्यांचे सत्र वाढले.जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १३८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक २९ आत्महत्या या पैठण तालुक्यात झाल्या. सिल्लोडमध्ये २० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. औरंगाबाद तालुक्यात ११, फुलंब्री १५, सोयगाव १३, कन्नड १९, वैजापूर १७, गंगापूर ८ आणि खुलताबाद तालुक्यात ६ शेतकºयांनी वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १३८ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी आत्महत्या केलेल्या ९० शेतकºयांच्या कुटुंबियांना तातडीची मदत देण्यात आली आहे. २८ आत्महत्यांची प्रकरणे मदतीस अपात्र ठरवून मदत नाकारण्यात आली आहे. २० प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे.जिल्ह्यातील पाच वर्षांतील शेतकरी आत्महत्यांचा आकडावर्ष आत्महत्या मदत अपात्र२०१३ ४ ४ ००२०१४ ५६ ४१ १५२०१५ १४४ १०६ ३८२०१६ १५१ १११ ४०२०१७ १३८ ९० २८एकूण ४९३ ३५२ १२१