शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बनावट खताचा साठा जप्त !

By admin | Updated: July 11, 2016 00:26 IST

लातूर : निलंगा तालुक्यातील येळनूर परिसरात एका खत विक्रेत्याच्या गोडावूनवर रविवारी कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा मारला.

लातूर : निलंगा तालुक्यातील येळनूर परिसरात एका खत विक्रेत्याच्या गोडावूनवर रविवारी कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा मारला. यावेळी मोठ्या प्रमाणात बनावट खताचा साठा आढळला. दरम्यान, संयुक्त पथकाने ३२३ बनावट खताचे पोते जप्त केले आहेत. शिवाय, यापूर्वीच अटकेत असलेल्या ‘त्या’ विक्रेत्याची न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. येळनूर येथील खत विक्रेता दिनेश कुलकर्णी या खत विक्रेत्याकडून बनावट खताची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभाग व पोलिसांना होती. या माहितीवरून पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केली होती. दरम्यान, रविवारी पोलिस व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने पुन्हा निलंगा येथील एमआयडीसीत असलेल्या दिनेश कुलकर्णी याच्या गोडावूनवर छापा मारला. यावेळी गोडावूनमध्ये ३२३ बनावट खताचे पोते आढळले. शिवाय, बनावट खत पोत्यांमध्ये पॅकिंग करण्यासाठी जे साहित्य वापरले जात होते, ते साहित्यही पथकाने जप्त केले आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यापूर्वीच कुलकर्णी यास पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी)संयुक्त पथकाने ३२३ खताचे पोते जप्त केले असून, पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे शिलाई मशीन, कात्री, दोरा, कटर व अन्य कच्चा माल ताब्यात घेतला आहे. निलंगा पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये जप्त करण्यात आलेले साहित्य ठेवण्यात आले आहे.रविवारी केलेल्या संयुक्त कारवाईत कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, मोहीम अधिकारी महेश क्षीरसागर, औराद पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील रेजितवाड, तालुुका कृषी अधिकारी सतीश देशमुख, नाबदे यांचा समावेश होता.पोलिस व कृषी विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी १० ते ३ या वेळेत येळनूर तसेच कुलकर्णी याच्या निलंगा एमआयडीसी परिसरात असलेल्या गोडावूनची कसून तपासणी केली. त्यात हे साहित्य आढळले आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाने यापूर्वी दिनेश कुलकर्णी याने शेतकऱ्यांना विक्री केलेले २१५ पोते यापूर्वीच ताब्यात घेतले होते. या पोत्यांतील खत नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बनावट असल्याचा आल्याने पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने परत रविवारी गोडावूनवरच छापा मारून खताचे पोते ताब्यात घेतले आहेत.कृषी आणि पोलिस विभागाने यापूर्वी २१५ आणि रविवारी ३२३ असे एकूण ५३८ बनावट खताचे पोते जप्त केले आहेत. अन्य साहित्यही जप्त केले आहेत. आता पोलिस तपासात यापूर्वी कुलकर्णी याने किती पोते खताची विक्री केली आहे, याचा तपास केला जाणार आहे.