औरंगाबाद : श्रीरामपूरहून औरंगाबादेत चोरीच्या मार्गाने आणल्या जाणाऱ्या देशी दारूच्या ९,६०० बाटल्या आणि एक ट्रक, असा १५ लाख रुपयांचा मुद्देमाल शनिवारी रात्री जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बीड बायपासवरील केम्ब्रिज रस्त्यावर ही कारवाई केली. याप्रकरणी संजय इंद्रमन राजपूत (३६, रा. सरस्वतीनगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि संतोष गंगाधर साठे (३०, रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा) या दोन मद्य तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार संजय कवडे (रा. बेलपिंपळगाव) हा पळून गेला. त्याचा घटनास्थळी पडलेला मोबाईल ताब्यात (पान ७ वर)
बनावट देशी दारूचा ट्रकभर साठा जप्त
By admin | Updated: May 3, 2016 01:13 IST