शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिकांचे बोगस प्रमाणपत्र; दोघे बडतर्फ तर ३५ जणांच्या शासकीय सेवेवर टांगती तलवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:56 IST

उर्वरित ३५ कर्मचारी जिल्ह्याबाहेर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र संबंधित विभागांना पाठविण्यात आले.

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिकांचे बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविलेल्या  जिल्हा प्रशासनातील मंडळ अधिकारी गणेश देवकाते आणि अव्वल कारकून कैलास थोरात यांना बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. उर्वरित ३५ कर्मचारी जिल्ह्याबाहेर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र संबंधित विभागांना पाठविण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिक नामनिर्देशित पाल्य म्हणून सरकारी सेवेत आलेल्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांशी कुठलेही नातेसंबंध नसताना अनेकांनी बनावट नामनिर्देशनपत्र तयार करून घेतले. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी तक्रारदार पी.एन. मोने यांनी केली होती. त्यानुसार १८ जून २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली होती. पुढे २५ फेबु्रवारी २०१९ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सहा आठवड्यांत याप्रकरणी निर्णय घेऊन त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याची मुदत होती. त्यानुसार दोघांना बडतर्फ करण्यात आले असून उर्वरित ३५ जणांवर कारवाईचे पत्र संबंधित विभागांना पाठविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

टांगती तलवार असलेले ३५ कर्मचारीनीलेश यार्दी (जि.प. पुणे), नितीन राठोड (आरोग्य विभाग, नाशिक), राजेंद्र सोळंके (पोलीस प्रशासन, जालना), अरविंद शेजूळ (पीडब्ल्यूडी, ठाणे), कल्याण सोळुंके(तंत्रशिक्षण विभाग, औरंगाबाद), प्रभाकर बारबैले (आरोग्य विभाग, औरंगाबाद), रावसाहेब गायकवाड, (भूमी अभिलेख, औरंगाबाद), बाबूराव जाधव (राज्य भाषा विभाग, औरंगाबाद), संजय तरटे (आरोग्य सेवा, औरंगाबाद), अशोक चंदनकर (जि.प. जालना), भारत ओलेकर (लेखापरीक्षा विभाग, बुलडाणा), भरत तवार (वन विभाग, औरंगाबाद), नामदेव मेटे (आरोग्य सेवा, औरंगाबाद), भाऊसाहेब वहाटुळे (शासकीय विद्यानिकेतन, औरंगाबाद), गणेश साळुंके (ग्रामीण आरोग्य सेवा, पिशोर), केशवराव डकले (जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद), दिलीप साबळे (कृषी आयुक्तालय, पुणे),  किशोर भोलाने (आरोग्य सेवा, औरंगाबाद), दत्तू तरटे (भूमी अभिलेख, औरंगाबाद), अशोक पवार (कृषी विभाग, औरंगाबाद), प्रदीप जाधव (मत्स्य व्यवसाय आयुक्तालय, मुंबई), रामदास म्हस्के (जिल्हाधिकारी, औरंगाबाद), गुलाब चव्हाण (वन विभाग, औरंगाबाद), दिलीप कदम (ग्रामीण आरोग्य सेवा, परांडा), विष्णू चव्हाण (पीएफ विभाग, परभणी), रवींद्र व्यवहारे (कृषी विभाग, जळगाव), कल्याण कवडे (जि.प. जालना), सोमनाथ जिवरग (आरोग्य विभाग, औरंगाबाद), विजय काळे (व्यवसाय प्रशिक्षण विभाग, औरंगाबाद), दत्तात्रय सूर्यवंशी (आरोग्य सेवा, वैजापूर), अनिल चव्हाण (आरोग्य सेवा, औरंगाबाद), त्र्यंबक चव्हाण (लेखा विभाग, जालना), प्रल्हाद लोखंडे (जिल्हाधिकारी, औरंगाबाद), विजय शेटे (नगररचना, पुणे), रमेश जगताप (लेखापरीक्षक विभाग, औरंगाबाद), जगन्नाथ भानुसे (कृषी विभाग, औरंगाबाद), दिगंबर कळंब (पीडब्ल्यूडी, जालना). 

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरतजिल्ह्यातील एकूण ३५ कर्मचारी स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य म्हणून राज्यातील वेगवेगळ्या शासकीय विभागांत कार्यरत आहेत. त्या सर्व शासकीय विभागांना पत्र देऊन कारवाई करण्याबाबत सुचविण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांनी दिली. 

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबाद