शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक स्थिती हाताळण्यात केंद्राला अपयश : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:50 IST

पी. साईनाथ यांनी ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

ठळक मुद्देमजुरांसाठी जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या योजनाही फसव्या होत्या. दीर्घकालीन परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेले असतानाच त्यातून पत्रकारिताही सुटलेली नाही.

औरंगाबाद : देशातील आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर वळणावर असून, कोरोनाविषयी राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे रसातळाला पोहोचली आहे. अर्थव्यवस्था खड्ड्यात जात असतानाही केंद्र शासन जागे होत नाही, हे अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभागातील विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील विविध मान्यवरांचे आॅनलाईन मार्गदर्शन आयोजित केले होते. यात पी. साईनाथ यांनी ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

यावेळी पी. साईनाथ म्हणाले, मागील तीन वर्षांपासून देश आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. यातच कोरोनाच्या काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने धोरणे आखण्यात आली. लॉकडाऊन जाहीर केला. यात कामगारांचे झालेले स्थलांतर  आणि त्यांचे हाल भयंकर होते. या धक्क्यातून सावरण्यासाठी देशाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मजुरांसाठी जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या योजनाही फसव्या होत्या. कामगारांना धान्य घेण्यासाठी पैसे मोजावे लागले आहेत. या काळाचे दीर्घकालीन परिणाम  अर्थव्यवस्थेवर झालेले असतानाच त्यातून पत्रकारिताही सुटलेली नाही. साखळी वृत्तपत्रांच्या महसुलांवर मोठा परिणाम  झाला असून, डिजिटल पत्रकारितेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. साध्या पत्रकारितेचे प्रमाण २५ टक्केच झाले असून, स्टेनोग्राफरची संख्या वाढली असल्याचेही पी. साईनाथ यांनी सांगितले.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी चांगले पत्रकार होत सामान्य जनतेची पत्रकारिता केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी  अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, विभागप्रमुख डॉ. दिनकर माने, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. मारुती तेगमपुरे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आयोजनावर आक्षेप?विद्यापीठातील वृत्तपत्र विभागातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या आॅनलाईन व्याख्यानमालेला ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, कुमार केतकर आदींची व्याख्याने आयोजित केली होती. या व्याख्यानमालेत  डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना बोलावण्यात आले होते. यावर उजव्या  विचारांच्या संघटनांना आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.  यासाठी राजभवनातून कुलगुरूंवर दबाव आणला असून, कुलगुरूंनी विभागप्रमुखांना बोलावून घेत यापुढे कोणलाही बोलावताना परवानगी घेण्याच्या सूचना केल्याचे वृत्तपत्र विभागातील एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. याविषयी  विभागप्रमुख डॉ. माने यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्था