शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नापास विद्यार्थ्यांनाही पदवी, आऊटसोर्सिंगमुळे गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 06:03 IST

- राम शिनगारे औरंगाबाद : परीक्षेतील घोटाळ्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आता चक्क नापास विद्यार्थ्यांना ...

- राम शिनगारेऔरंगाबाद : परीक्षेतील घोटाळ्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आता चक्क नापास विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या बीसीए (बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) या अभ्यासक्रमात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाने महाविद्यालयाला पाठविले आहे. दोन नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व त्यांना विद्यापीठाने बहाल केलेल्या पदव्या ‘लोकमत’ला प्राप्त झाल्या आहेत.विद्यापीठाने मार्च/एप्रिल २०१७मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रमाणपत्रांचे वाटप या वर्षी पहिल्यांदाच महाविद्यालयांमार्फत होत आहे. मे महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात केवळ पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.यंदा प्रथमच पुण्यातील ‘शेषासाई’ या खासगी कंपनीला प्रमाणपत्र छपाईचे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीकडे शेवटच्या सत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ‘डाटा’ पाठविण्यात आला. मात्र, त्यातील अनेक विद्यार्थी नापास झालेले आहेत.़प्रशासन अडचणीतछापलेल्या प्रमाणपत्रांची उत्तीर्ण विद्यार्थ्यांनुसार पडताळणी करून महाविद्यालयांकडे पाठविण्याची आवश्यकता होती. मात्र परीक्षा भवनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुण्याहून आलेले प्रमाणपत्रांचे बॉक्स थेट महाविद्यालयांकडे सुपुर्द केले. नापास विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचाही समावेश होता.घडलेला प्रकार गंभीर आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित विभागातील अधिकाºयांनी मला कळविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी ते केले नाही. ‘लोकमत’कडूनच ही माहिती कळल्यानंतर उच्चस्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढवा घेतला. यात महाविद्यालयांना नापास विद्यार्थ्यांच्या पदव्या गेल्या खºया. मात्र, विद्यार्थ्यांना त्या पदव्यांचे वाटप झालेले नाही.- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू‘त्या’ पदव्यांचा शोधप्राथमिक अंदाजानुसार बीसीए, बीसीएस, व्यवस्थानशास्त्र विभागाच्या जवळपास ४० ते ५० नापास विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र छापलेल्यांमध्ये समावेश असून, इतर अभ्यासक्रमांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.आता परीक्षा भवनातील अधिकारी, संगणक विभाग नापास विद्यार्थ्यांच्या पदव्यांचा शोध घेत आहेत.