शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

प्राध्यापक भरती रखडली; मंत्रालयात परवानगी अडली!

By राम शिनगारे | Updated: June 9, 2023 08:28 IST

शासनाने बहुप्रतीक्षित राज्यातील अकृषी व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या ४० टक्के जागा भरण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

राम शिनगारे, लोकमत न्यूज नेटवर्क,  छत्रपती संभाजीनगर : शासनाने बहुप्रतीक्षित राज्यातील अकृषी व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या ४० टक्के जागा भरण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार २ हजार ६६८ मंजूर प्राध्यापकांच्या पदांपैकी १ हजार ४३२ रिक्त जागा आहेत. त्यातील ६५९ पदांची भरती होणार आहे. गडचिरोली विद्यापीठाचा अपवाद वगळता इतर १४ विद्यापीठांना भरतीची जाहिरात काढण्यासाठी शासनाकडून ‘एनओसी’च मिळत नसल्याचे समोर येत आहे. 

या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या मंजूर जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक रिक्त आहेत. कंत्राटी प्राध्यापकांच्या नेमणुका विद्यापीठांमध्ये कराव्या लागत आहेत. त्याचा परिणाम नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठांची घसरण होण्यात झाला आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांनी आरक्षण सेलकडून बिंदू नामावली तपासून घेत पदभरतीच्या ‘एनओसी’साठीचे प्रस्ताव उच्चशिक्षण संचालकांमार्फत मंत्रालयात पाठविले आहेत.  तेथून एनओसी अद्यापही मिळालेली नाही.   

सहा वर्षांपासून पदभरती रखडलेलीच 

तत्कालीन राज्य शासनाने २५ मे २०१७ रोजी सर्व विभागांमधील पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम होईपर्यंत नोकरभरतीवर बंदी घातली होती. आकृतिबंध तयार झाल्यानंतर शासनाने नेमलेल्या उपसमितीने विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यास मंजुरी दिली. त्यानुसार ६५९ पदांच्या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर सरकार बदलले. कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबली. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी वित्त विभागाच्या उपसमितीने विद्यापीठांमधील ६५९ पदांच्या भरतीस मान्यता दिली. त्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही.  

विद्यापीठातील प्राध्यापकांची आकडेवारी 

विद्यापीठ        मंजूर पदे    रिक्त पदे    मान्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.    २५९    १४०    ७३स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.    १५७    ५७    ११मुंबई विद्यापीठ.        ३७८    २११    १३६एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई.    २५८    १२९    ७८कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ.    ४३    २१    १२राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.    ३३९    १६०    ९२पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर.    ४६    १६    ०७शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.        २६२    १२४    ७२सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.    ४००    १९१    १११कवयित्री बहिणाबाई चौधरी उ. म. विद्यापीठ.     १११    २८    ०६ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.        १२१    ३७    १३

 

टॅग्स :Educationशिक्षणjobनोकरी