शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणावलेले डोळे आभाळाकडे

By admin | Updated: July 6, 2014 00:15 IST

भास्कर लांडे, हिंगोली मृग सरला, आर्द्राही कोरड्या गेल्या पण पावसाचा रूसवा गेलेला नाही. शेतकऱ्यांजवळचा चारा संपला पाणवठे कोरडे पडले. परिणामी जनावरांचे पोट पाठीला गेले.

भास्कर लांडे, हिंगोलीमृग सरला, आर्द्राही कोरड्या गेल्या पण पावसाचा रूसवा गेलेला नाही. शेतकऱ्यांजवळचा चारा संपला पाणवठे कोरडे पडले. परिणामी जनावरांचे पोट पाठीला गेले. वर्षानुवर्षाप्रमाणे यंदाही सावकाराच्या पैशांवर घेतलेल्या बियाण्याला किडे लागण्याची वेळ आली. तरीही वरूण राजाची वक्रदृष्टी कायम राहिली. दरवर्षी या वेळेत कोळपणी करणारा शेतकरी यंदा पाणावलेल्या डोळ्याने आभाळाकडे पाहत आहे. मराठवाड्यात नांदेडनंतर सर्वाधिक पाऊस हिंंगोली जिल्ह्यात पडतो. गतवर्षी १२ जूनला आलेल्या मान्सूनने पावसाळ्यात थांबण्याचे नाव घेतले नव्हते. मागील अनुभव पाहता कृषी विभागाने खरिपासाठी खत-बियाण्यांचे नियोजन केले. यंदा ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर होणाऱ्या पेरणीसाठी २५ हजार २०० पेक्षा अडीच अधिक असा हजार मेट्रीक टन खत मागविला. दरम्यान, २० हजार २५० मेट्रीक टन खत वाटपही केला. त्यातील युरिया आणि डीएपीचा तुटवडाही भरून काढला. दुसरीकडे कापसाच्या बियाण्याला कोणी विचारिनाशे झाले. तर तूर, मूग, उडीद आदी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटून सोयाबीनचे ४० हजार हेक्टर क्षेत्र वाढले. वाढलेल्या क्षेत्रासाठी बियाणे कमी पडण्याची शक्यता असल्याने सोयाबीन बियाण्यांचा काळा बाजार होण्याची भीती निर्माण झाली होती. कारण गतवर्षी काढणीच्या हंगामात आलेल्या पावसामुळे सोयाबीनला बाधा पोहचली होती. परिणामी नामांकित कंपनींच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरू असताना मृग निगाला. या नक्षत्रातील पहिल्याप्रमाणे दुसरा आठवडा कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा आर्द्रावर एकवटल्या. आर्द्रात उजाडला तो दिवस सारखाच निघत असताना ६ जुलैै रोजी पुनर्वसू नक्षत्राला सुरूवात होईल. दरम्यान, पावसाने पडण्याचे नाव घेतले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. गतवर्षी ३ जुलैैपर्यंत जिल्ह्यात २८८ मिमी पाऊस पडला होता. त्याआधी लवकरच पावसास सुरूवात झाल्याने पेरणी आटोपून पंधरवडा उलटला होता. गतवर्षी यावेळेला कोळपणी, खत, निंदणी, फवारणी करणारा उत्पादक यंदा पावसाचा धावा करताना दिसतो. कारण ४ जुलैैपर्यंत २३८ मिमी पावसाची गरज असताना केवळ २२ मिमी पाऊस झाला. याच पावसावर काही शेतकऱ्यांनी धुळ पेरणीचा डाव साधण्याचा प्रयत्न केला; पण पावसानेच दडी मारल्याने पेरणीचा डाव उलटल्याने एक-एक शेतकरी लाख-लाख रूपयांना बुडाला. अधिच सावकाराच्या कर्जावर घेतलेले महागामोलाचे बियाणे वाया गेल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडल्यासरखे झाले. त्यातच उन्हाचा पारा कायम राहिल्याने विहिरी तसेच बोअरने तळ गाठला. मोजकाच असलेला चारा संपला, जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला. दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. उन्हाळ्यात थोड्याश्या पाण्यावर लागवड केलेला कापूस वाळू लागला. त्यातच दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या उत्पादकांनी पावसासाठी धावा सुरू केला. सरसगट ही स्थिती असल्याने यंदा पावसाऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पहावयास मिळाले. २०१४ मधील पावसाचे नक्षत्रनक्षत्र दिनांकवाहन मृग८ जून हत्तीआर्द्रा२२ जून मोरपुनर्वसू६ जुलै गाढवपुष्य२० जुलै मेंढाआश्लेषा३ आॅगस्ट उंदीरमघा १६ आॅगस्ट कोल्हापूर्वा ३० आॅगस्ट मोरउत्तरा १३ सप्टेंबर घोडाहस्त २७ सप्टेंबर बेडूकचित्रा १० आॅक्टोबर म्हैस स्वाती २४ आॅक्टोबर घोडादुबार पेरणीचे संकटमृग नक्षत्रात पाऊस झाल्याने हिंगोली तालुक्यातील आंबाळा-७० टक्के, आंबाळा तांडा-७०, बोंडाळा, वेलुरा, वडद, एकांबा, भिंगी, फाळेगाव, आडगावात अनुक्रमे ४० टक्के पेरण्या झाल्या होत्या; परंतु पावासाने दडी मारल्याने या गावात निघालेली पिके वाळली. लाखो रूपये खर्च करून महागामोलाचे खत-बियाणे वाया गेली. मृग नक्षत्राच्या पावसावर खेळलेला जुगार उत्पादकांच्या चांगलाच अंगलट आला. परिणामी लाखो रूपयांना बुडाल्याची भावना अंबाळा येथील नामदेव इंगोले, नामदेव लांडगे, नारायण इंगोले, अशोक भिसे, कडुजी इंगोले, भीमा भिसे, धम्मराज सावंत, विलास भिसे, पृथ्वीराज सावंत, झनक भिसे यांनी व्यक्त केली.आपत्कालीन पीक नियोजनमान्सून लांबल्याने उत्पादकांनी कोणती पिके घ्यावीत आणि कोणती पिके घेवू नयेत, असा सल्ला दिला जात आहे. १५ जून ते ७ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके घेता येतात. ८ ते १५ जुलैै-कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफुल. १६ ते ३१ जुलैै- बाजरी, सुर्यफुल, तूर+सोयाबीन (+ आंतरपीक), बाजरी +तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. १ ते १५ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+तीळ+बाजरी, एरंडी+धने, एरंडी+तूर. १६ ते ३१ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफूल, तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर आणि धने. कोणती पिके आता घेवू नयेत...८ ते १५ जुलैै- भुईमूग, मूग, उडीद. १६ ते ३१ जुलैै-कापूस, ज्वारी, भुईमूग. १ ते १५ आॅगस्ट- कापूस, ज्वारी, भुईमूग. १६ ते ३१ आॅगस्ट- कापूस, ज्वारी, भुईमूग, तीळ.