शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अँड्राईड टीव्हीसाठी उधळपट्टीचा घाट !

By admin | Updated: April 30, 2017 23:42 IST

बीडप्रगतशील शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

संजय तिपाले बीडप्रगतशील शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून अँड्रॉईड टीव्ही संच खरेदीला परवानगी दिली आहे; परंतु बीड तालुक्यात टीव्ही खरेदीच्या आडून उधळपट्टीचा घाट घातला जात आहे. २३ हजाराच्या टीव्हीकरता तब्बल ३३ हजार रुपये वसूल केले जात आहेत. ग्रामसेवक संघटनेचे काही पुढारी एकाच कंपनीकडून एकाचवेळी १७४ टीव्ही खरेदी करण्याची ‘अर्थ’पूर्ण ‘शाळा’ करु पाहत आहेत.केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगातून क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन दिला आहे. २०१५ ते २०२० अशी ही पंचवार्षिक योजना असून टप्प्याटप्प्याने निधी देणे सुरु आहे. जिल्ह्यातील १०२४ ग्रामपंचातींना पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, शोषखड्डे, सार्वजनिक स्वच्छतागृह, दुरुस्ती- देखभाल आदी कामे करावयाची आहेत. दरम्यान, प्रगतशील शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेंतर्गत शाळांमधील भौतिक सोयीे- सुविधा वाढविण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नाही. लोेकसहभाग व स्थानिक विकास निधीतून ही कामे करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात जि.प. च्या २९०० हून अधिक जि.प. शाळा असून त्या डिजिटल करण्यासाठी अँड्रॉईड टीव्ही खरेदी करण्यास सीईओ नामदेव ननावरे यांनी मुभा दिली आहे. ग्रामपंचायतींनी शाळांच्या आवश्यकतेप्रमाणे व कुवतीनुसार अँड्रॉईड टीव्ही खरेदी करणे अपेक्षित आहे. बीड तालुक्यात १७४ ग्रामपंचायती असून टीव्हीची एकत्रित नियमबाह्य खरेदी करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेतील दोन पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून ३३ हजार रुपये वसूल करणे सुरु केले आहे. २३ हजार रुपये बाजारमूल्य असलेल्या टीव्हीसाठी ३३ हजार रुपये गोळा करण्याचा सपाटा लावला आहे. उल्लेखनीय म्हणजे एकाच वेळी एकाच कंपनीकडून या टीव्ही मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, १७४ टीव्हींसाठी प्रत्येकी १० हजार रुपये अधिक खर्च झाले तर १७ लाख ४० हजार रुपये वाया जातील.