शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

अनुभवली ‘योग’पहाट !

By admin | Updated: June 22, 2015 00:21 IST

बीड : पहिल्यांदाच साजऱ्या झालेल्या जागतिक योगदिनाला रविवारी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये,

बीड : पहिल्यांदाच साजऱ्या झालेल्या जागतिक योगदिनाला रविवारी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालयांमध्ये योगासन- प्राणायाम करण्यात आले. एरवी सकाळी नऊपर्यंत ‘शवासन’ (झोपेचे आसन) करणारे अधिकारी- कर्मचारी व नागरीक रविवार असूनही पहाटेपासूनच जागे होते. जिल्हा पतंजली योग समितीने शिवसांस्कृतिक भवनात सर्वांत मोठा कार्यक्रम घेतला. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ‘राजयोगाद्वारा सुखी जीवन’ हा विशेष कार्यक्रम पोलीस मैदानावर घेण्यात आला. यावेळी बी. के. प्रज्ञा यांनी मार्गदर्शन केले. आर्ट आॅफ लिव्हींगच्या वतीने देखील श्री श्री रविशंकर शाळेच्या मैदानावर योग-ध्यानधारणा कार्यक्रम झाला. दुपारी चार वाजता ‘नो युवर चाईल्ड’ (तुमच्या मुलांना ओळखा) हा कार्यक्रम झाला. संतो सावंत यांच्यासह इतर उपस्थित होते. पतंजलीच्या वतीने ेशिवसांस्कृतिक भवनात राजधानी दिल्लीतील योगविक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. हजारो बीडकरांनी ‘लाईव्ह’ योगा केला. गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. अरुण भस्मे, अ‍ॅड. कालीदास थिगळे, जि.प. सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, अ‍ॅड. कालीदास थिगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रवीण पवार, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, नितीन धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारत स्वाभिमानचे प्रांत प्रभारी अ‍ॅड. लाखे यांनी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतीचिन्ह व योगामृत पुस्तक देऊन सत्कार केला. लाखे यांनी योग- प्राणायामाबाबत मार्गदर्शन केले. योगाचा प्रचार, प्रसार करुन योगप्रशिक्षण देण्याचे काम करणाऱ्या योगशिक्षकांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी अ‍ॅड. लाखे यांचा जिल्हा पतंजली समितीच्या वतीने नितीन गोपन, हेमा विभूते, रत्नाकर कुलकर्णी, आर. व्ही वजूरकर यांनी विशेष सत्कार केला. ७० दिवसांच्या योगशिबिराला मोफत लॉन, मैदान उपलब्ध करुन देणाऱ्यांचा पतंजलीच्या वतीने सत्कार झाला. त्यानंतर सकाळी सात वाजता दिल्लीत सुरु झालेल्या विक्रमीयोग साधनेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. तेथे सुरु असलेल्या योगासन- प्राणायामासोबत बीडकरांनीही कृती केली. जिल्हा रुग्णालयातील डॉ. एस. एच. मोगले यांनी योगप्रसादाची सोय केली होती. यावेळी हजारो नागरीक उपस्थित होते.गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, काकू- नाना प्रतिष्ठानच्या वतीने २०१० मध्ये रामदेव बाबांना बीडमध्ये आणले होते. योगदिंडीतून शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य सुरक्षित रहावे, यासाठी पतंजलीच्या माध्यमातून प्रयत्न केला. बीड पतंजलीने सामान्यांपर्यंत योग पोहोचविण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. त्यांना आपले संपूर्ण पाठबळ असेल, असेही त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानने नेहमी विविध लोकोपयोगी कार्यांत सहभाग घेतलेला आहे. तो यापुढेही राहील, असेही ते म्हणाले.अ‍ॅड. लाखे यांनी सांगितले की, योगदिनानिमित्त पतंजलीने शिबीर आयोजित केले होते, पण काकू- नाना प्रतिष्ठानमुळे शिबिराचे रुपांतर योगदिंडीत झाले. अनेकांचे दुर्धर आजार व व्याधीपासून मुक्ती झाली, याचे सामाधान असल्याचे ते म्हणाले. योगदिंडीचा समारोप झाला असला तरी शहरात विविध भागांत स्थायीवर्ग सुरु आहेत. एकूण ५० स्थायीवर्ग सुरु होतील, असे त्यांनी सांगितले. योग-प्राणायामातून नागरिकांचे मेडिकल बजेट झिरो करायचेयं असा संकल्प त्यांनी केला.स्वामी रामदेव बाबा यांच्या जीवनप्रवासावर आधारित तसेच बीड पतंजलीने आयोजित ७० दिवसांच्या योगदिंंडीची चित्रफित दाखविण्यात आली. बीड येथील सचिन नलावडे यांनी योगदिंडीचा प्रवास ९ मिनिटांच्या माहितीपटातून जशास तसा मांडला. अ‍ॅड. लाखे व त्यांच्या टीमने घेतलेल्या परिश्रमावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या माहितीपटाने उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. नलावडे यांचा अ‍ॅड. लाखे यांनी सत्कार केला.करो योग... जागतिक योगदिनानिमित्त रविवारी बीडमध्ये शिवसांस्कृतिक भवन येथे जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिल्ली येथे झालेल्या विक्रमी योगाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दिल्लीतील प्रात्यक्षिकांच्या आधारे बीडकरांनी ३२ मिनिटांची योगासने केली. यावेळी अ‍ॅड. श्रीराम लाखे, नितीन गोपन, हेमा विभूते, रत्नाकर कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. इन्सेट दिल्लीतील योगाच्या थेट प्रक्षेपणाची एलईडी चित्रफित दाखविण्यात आली.७० दिवसांच्या योगदिंडीत शहरातील विविध भागांतील नागरीक सहभागी होत. शिबीर कुठल्याही भागात असो तेथे नित्यनेमाने हजेरी लावणारे साधकही मोठ्या प्रमाणात होते. या योगयज्ञाच्या माध्यमातून ऋणानूबंध जुळले होते. योगदिंडीचा समारोप झाल्यामुळे साधक विखूरले जाणार आहेत, ही भावना अनेकांना हूरहूर लावून गेली. लोकांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या अ‍ॅड. लाखे यांना एका आजीबार्इंनी गळ्याला लावले. ‘मला दोन मुले आहेत, तू आजपासून तिसरा’ असे भावोद्गार त्यांनी काढले. तेंव्हा लाखे यांचे डोळे भरुन आले. आजीबाई अन् इतर साधकांची भावनाही यापेक्षा वेगळी नव्हती.