शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

तीन कोटीचा खर्च; अस्वच्छता कायम

By admin | Updated: July 4, 2016 00:13 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील नाल्यांची साफासफाई, कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाकाठी जवळपास

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील नाल्यांची साफासफाई, कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाकाठी जवळपास ३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येतो़ या कामासाठी २४ घंटागाड्या, पालिकेचे व कंत्राटदाराचे असे जवळपास २२५ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे़ मात्र, कामाचे नियोजन कोलमडल्याने शहरातील बहुतांश भागातील नाल्यांचा प्रश्न कायम आहे़ तर कचराही वेळेवर उचलला जात नसल्याने ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे़दीड लाख लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहराची स्वच्छता करण्यासाठी नगर पालिकेने कंत्राट दिले आहे़ या कामी पालिकेचे जवळपास ६७ कर्मचारी, कंत्राटदारांचे जवळपास १६० कर्मचारी असे २२५ कर्मचारी कार्यरत आहेत़ पहाटे ५ ते ८ या कालावधीत शहरातील मुख्य रस्त्यांची साफासफाई आणि कचरा डंम्पिंग ग्राऊंडमध्ये नेवून टाकण्याचे काम केले जाते़ तर ८ ते ११ या वेळेत ‘डोअर- टू डोअर’ कचरा गोळा केला जातो़ तर दिवसभरात विविध भागातील नाल्या साफ करणे, कचरा उचलून कचराकुंडीत टाकण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले आहे़ मागील महिन्यात पालिकेने विशेष स्वच्छता अभियान राबविले होते़ मात्र, रविवारी शहरातील विविध भागांची पाहणी केली असता काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून आले़ तर काही भागातील नाल्या तुंबल्याचे दिसून आले़ विशेषत: समता नगरासह, समर्थनगर भागातील काही नाल्यांवर फरशी टाकण्यात आल्याने त्या स्वच्छ करता येत नाहीत़ त्यामुळे नाल्या तुंबत आहेत़ मात्र, पालिकेकडून या फरशा काढण्याबाबत घरमालकांना सूचनाही देण्यात येत नाहीत़ शहराच्या काही भागातील अवस्था अशीच आहे़ समर्थनगर मध्ये अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे़ सह्याद्री कॉर्नरजवळील भागातही मोठी अस्वच्छता पसरली आहे़ तर नगर पालिकेच्या कार्यालयात प्रवेश करताना उजव्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीजवळच कचरा साचला आहे़ शिवाय पालिकेतही शहराच्या वाढीव हद्दीतील अनेक भागात तर नाल्यांचा पत्ताच नाही़ शिवाय इतर गैरसोयींमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ याशिवाय शहरातील ख्वॉजानगर, भीमनगर, ज्ञानेश्वर मंदीर परिसरासह इतर भागातील अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्यांचा प्रश्न कायम आहे़