शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार?

By विकास राऊत | Updated: July 4, 2024 16:12 IST

७३४ कोटींची तरतूद होऊन वर्ष झाले, भूसंपादन मात्र अद्याप कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तयारी होत असताना धावपट्टीसाठी करण्यात येणारी भूसंपादन प्रक्रिया ७३४ कोटींची तरतूद होऊनही कागदावरच आहे.

नगररचना विभागाचा भूसंपादन अधिकारी नेमल्यामुळे भूसंपादनाला खीळ बसली आहे. या प्रकरणात शासनाला कळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ऑरिकमध्ये अँकर प्रोजेक्ट न येण्यामागे विमानतळ धावपट्टी अरुंद असल्याचे कारण मागे समोर आले होते. त्यानंतर धावपट्टी विस्तारीकरणासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. सहा वर्षांत यावर फक्त चर्चाच झाल्या. गेल्यावर्षी शासनाने भूसंपादनासह इतर घटकांसाठी तरतूद केली. परंतु अजूनही विस्तारीकरणास चालना मिळालेली नाही. विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी दक्षिण बाजूने १४७ एकर जमीन लागणार आहे. भूसंपादनासह इतर कामांसाठी शासनाने ७३४ कोटी रुपयांची तरतूद मार्च २०२३च्या अर्थसंकल्पात केली. वर्षभरात कुठलीही हालचाल झालेली नाही. तीन वर्षांपासून विस्तारीकरणासाठी अनुदान मिळण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा झाला. शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केली, भूसंपादन अधिकारी नियुक्त केले, परंतु पुढे काहीही झाले नाही.

का झाला धावपट्टीच्या विस्ताराचा निर्णय?गेल्यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने विमानतळ प्राधिकरणाला भूसंपादनासाठी २०१३च्या कायद्यानुसार ४६५ कोटी ८५ लाख तर खासगी जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ५४० कोटी ४ लाख रुपयांचा निधी लागेल, असा प्रस्ताव दिला होता. शासनाने मार्च २०२३ मध्ये ७३४ कोटींची तरतूद केली. पहिल्या मोजणीत आलेल्या १२०० मालमत्ता वाचविल्या असून, १ डिग्रीने धावपट्टीचे अलायन्मेंट सरकवले आहे. टॅक्सी रन-वेसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी येथील धावपट्टी विस्तारेल. शिवाय उद्योग वाढीसाठी चालना मिळेल. यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे.

तर भूसंपादन अधिकारी बदलण्याची मागणीभूसंपादन प्रक्रियेबाबत बुधवारी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात बोलणी झाली. भूसंपादनाची जबाबदारी नगररचना विभागाशी निगडित अधिकाऱ्यावर सोपविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. याबाबत दोन दिवसांत बैठक होईल. भूसंपादन अधिकाऱ्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात येईल. मुदतीत काम सुरू झाले नाही तर, भूसंपादन अधिकारी बदलून द्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात येईल. धावपट्टीचा विस्तार झाला तरच उद्योग, पर्यटनवाढीसाठी चालना मिळेल.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळtourismपर्यटनbusinessव्यवसाय