शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा विस्तार अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:52 IST

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा आगामी काळात विस्तार होऊन मोठ्या रेल्वेस्टेशनप्रमाणे विस्तार आणि विकास करणे अशक्य होणार आहे. सुविधा देण्यासाठी जागाच नसल्याचे कारण रेल्वेकडून पुढे केले जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा आगामी काळात विस्तार होऊन मोठ्या रेल्वेस्टेशनप्रमाणे विस्तार आणि विकास करणे अशक्य होणार आहे. सुविधा देण्यासाठी जागाच नसल्याचे कारण रेल्वेकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे यापुढील काळात जागेअभावी हे रेल्वेस्टेशन ‘जैसे थे’ राहणार असून, रेल्वेना थांबा आणि मोजक्या सुविधांवर प्रवाशांना समाधान मानावे लागणार आहे.१९९६ मध्ये पूजन झाल्यानंतर २००० मध्ये हे मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन पूर्णत्वास आले. ९ जानेवारी २००० रोजी हे हॉल्ट स्टेशन सुरू झाले. सिडको, हडको, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, ठाकरेनगरसह लगतच्या ५ ते ६ लाख नागरिकांच्या सुविधेसाठी हे रेल्वेस्टेशन सुरू करण्यात आले. पूर्वी या भागातील नागरिकांना मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असत. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन सुरू झाल्यानंतर नागरिकांना सुविधा मिळाली; परंतु अपुºया सोयी-सुविधांमुळे गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली.या रेल्वेस्टेशनचा मार्च २०१५ मध्ये ‘डी’ दर्जाच्या स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘डी’ वर्गातील स्टेशनवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी याठिकाणी सुरू असलेली बुकिंग कक्ष, वेटिंग हॉल यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ही कामे महिनाभरात पूर्ण होतील; परंतु त्यानंतर आगामी अनेक वर्षे रेल्वेस्टेशनवर विकास कामे होणे अवघड दिसते. त्यासाठी जागेचे कारण सांगितले जात आहे.रेल्वेस्टेशनला लागून वसाहतीमुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्या आहेत. आगामी काळात एक्स्प्रेस रेल्वेना थांबा मिळाल्यास स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढेल; परंतु जागेअभावी प्रवाशांच्या सुविधेसाठी वाहन पार्किंग, एटीएम, मोठे प्रतीक्षालय अशा सुविधा देण्यास अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे दिसते.जबाबदारी घेऊ शकणार नाहीदक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी २० डिसेंबर रोजी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनची पाहणी केली. येथील विकासकामे महिनाभरात पूर्ण क रण्याची सूचना त्यांनी केली. रेल्वेस्टेशनवर पाहणी करताना जागेची अडचण त्यांच्या निदर्शनास आली. रेल्वेची जागा कमी आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म संपताच रेल्वेची जागा संपते. या परिस्थितीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्यास टॅक्सी स्टँडसह अन्य सुविधा देण्यासाठी रेल्वे जबाबदारी घेऊ शकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मुकुंदवाडी स्टेशनची स्थिती४ये-जा करणाºया १५ पॅसेंजर थांबतात.४ दररोज सुमारे ३५ हजार रुपयांची तिकीट विक्री.४केवळ मराठवाडा एक्स्प्रेसला थांबा.४जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेससह अन्य एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी.