शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कृउबाचा तडजोडीचा ठराव बेकायदाच; विद्यमान सभापती, संचालकांनी मंजूर केलेला ठराव ‘गोत्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:10 IST

जळगाव रोडलगत असलेल्या २० एकर जमिनीच्या तडजोडीचा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, संचालकांनी मंजूर केला आहे. मात्र, मुळात यासाठी कायद्यानुसार राज्य पणन संचालकांची पूर्व परवानगी आवश्यक असते, तशी परवानगी न घेताच ठराव घाईघाईत मंजूर केला. त्यामुळे तडजोडीचा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी संचालक काकासाहेब कोळगे पाटील यांनी केला आहे. 

औरंगाबाद : जळगाव रोडलगत असलेल्या २० एकर जमिनीच्या तडजोडीचा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, संचालकांनी मंजूर केला आहे. मात्र, मुळात यासाठी कायद्यानुसार राज्य पणन संचालकांची पूर्व परवानगी आवश्यक असते, तशी परवानगी न घेताच ठराव घाईघाईत मंजूर केला. त्यामुळे तडजोडीचा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी संचालक काकासाहेब कोळगे पाटील यांनी केला आहे. 

जाधववाडीतील कृउबामध्ये येण्यासाठी जळगाव रोडवरून २१ मीटरचा रस्ता बिल्डर्स तयार करून देणार आहे. तसेच मुख्य कमान, सुरक्षारक्षकाची केबीन, पथदिवे, फुटपाथचा सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च येणार आहे. हा संपूर्ण खर्च बिल्डर्स करणार असून, रस्त्यासाठी लागणार्‍या १ एकर जमिनीचा खरेदीखतही बाजार समितीच्या नावाने करून देणार आहे. या बदल्यात बाजार समितीने २० एकर जागेवरील आपला हक्क सोडून द्यावा, असा तडजोडीचा प्रस्ताव बाजार समितीत मांडण्यात आला होता. विद्यमान सभापती व संचालक मंडळाने ‘तडजोडी’ चा ठराव मंजूर केला. आता हा ठराव सुप्रीम कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब कोळगे पाटील यांनी सांगितले की, बाजार समितीला तडजोडीचा कोणताही ठराव मंजूर करण्यापूर्वी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ -१९६७ याप्रमाणे कलम १२ (१) नुसार राज्य पणन संचालक पुणे यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, तडजोडीचा ठराव घेताना बाजार समितीने पणन संचालकांची पूर्व परवानगी घेतली नाही. त्यामुळे  मंजूर केलेली तडजोड बेकायदेशीर आहे. विद्यमान सभापती व संचालकांनी तडजोडीची घाई न करता बाजार समितीच्या विकासाचा विचार करावा, जमीन विकण्याचा किंवा तडजोडीचा विचार करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. 

सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज काकासाहेब कोळगे पाटील म्हणाले की, २० एकर जमीन वाचविण्यासाठी १९८८ पासून बाजार समिती प्रयत्न करीत आहे. २००३-०४ मध्ये सर्वोच्च  न्यायालयात जागा वाचविण्यासाठी आम्ही हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. विद्यमान संचालकांनी घेतलेल्या तडजोडीच्या निर्णयाच्या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद