औरंगाबाद : लियो क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी शपथग्रहण करून सामाजिक सेवा कार्याला सुरुवात केली.
लियो क्लबच्या या शपथग्रहण सोहळ्यात आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. पॉटी हिल यांनी कॅनडा येथून झूम मीटिंगद्वारे सहभाग नोंदविला, तर प्रमुख पाहुणे लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू यांच्या हस्ते क्लबचे उद्घाटन झाले. लियो क्लबचे अध्यक्ष भूषण पाटील, सचिव प्रतीक वाघमारे, कोषाध्यक्ष श्रीकर औसेकर, उपाध्यक्ष धीरज पाटील, सहसचिव रोहन करवंदे, फेलोशिप हेड गौरी भारुका, क्रिएटिव्ह शलाका लाहुरीकर, इव्हेंट हेड गायत्री झलवर यांना डॉ. पॉटी हिल यांनी शपथ दिली. यावेळी एमसीसी गिरीश मालपाणी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सीए विवेक अभ्यंकर, तसेच दिलीप मोदी, पुरुषोत्तम जयपुरीया, महावीर पाटणी, राजेश पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.