शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

'गिरिजा'त विहिरी खोदण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:16 IST

खुलताबाद तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात विहिरी खोदण्याचा शेतक-यांनी धडाका लावला आहे. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना धमकावले जाते. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न गंभीर होणार आहे.

सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात विहिरी खोदण्याचा शेतक-यांनी धडाका लावला आहे. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना धमकावले जाते. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न गंभीर होणार आहे.या जलाशयाची पाणीपातळी अतिशय जेमतेम असताना त्यातून सर्रास अवैधरित्या पाण्याचा उपसा परिसरातील शेतकरी करीत असून त्याचबरोबर मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात कुठलीही परवानगी नसताना अवैधरित्या विहिरी खोदण्याचे काम सुरू आहे.कारवाई करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना धमकी दिल्या जात आहेत.या प्रकरणी पाटबंधारे विभागाने तहसील कार्यालयास याबाबत पत्रही दिले आहे.खुलताबाद तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणारा येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला होता; परंतु परतीच्या पावसाने प्रकल्पात दीड ते दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.गिरिजा मध्यम प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या शेकडो विहिरी खोदून या विहिरीचे पाणी सर्रास शेतीसाठी वापरण्यात येत आहे. त्याच गिरिजा प्रकल्पात पाणी असल्यास प्रारंभी पाण्याचा उपसा करण्यात येतो, हे विशेष.खुलताबादसह २० गावांना होतो पाणीपुरवठाजेमतेम पाणीसाठा असलेल्या पाण्यावरही परिसरातील काही लोक अवैधरित्या विद्युत मोटारीद्वारे पाण्याची चोरी करीत असल्याने हा पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे खुलताबाद शहर व तालुक्यातील २० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. मध्यम प्रकल्पात सध्या पाणी नसल्याने अनेक जणांनी प्रकल्पातच बेकायदेशीर विहिरी खोदण्याचे काम सुरू केले आहे. विहिरीचे काम थांबविण्यासाठी गेलेले पाटबंधारे सिंचन विभाग येसगाव शाखेच्या वतीने जलसंपदा विभागाचे पंकज शिंदे, व्ही. एस. शिंनगार, डी. एम. बनकर, संतोष व्यवहारे, पी. एस. गाडेकर, व्ही. के. दुलत यांनी २-३ वेळा सदरील काम रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमक्या देऊन हाकलून लावण्यात आले.