शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार वाळू उपसा सुरूच

By admin | Updated: August 24, 2014 01:14 IST

औंढा नागनाथ : पूर्णा नदी घाटावर परवाना नसतानादेखील अवैधपणे यंत्राच्या सहाय्याने बेसुमार वाळूचा उपसा होत आहे.

औंढा नागनाथ : शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना मूठमाती देत पूर्णा नदीवरील पोटा, अंजनवाडी वाळू घाटावर गौण खनिजाचे उत्खनन करण्याचा परवाना नसतानादेखील अवैधपणे यंत्राच्या सहाय्याने बेसुमार वाळूचा उपसा होत आहे. नियमांचा बोजवारा उडविणाऱ्या माफियांना प्रशासनाकडूनच पाठबळ मिळत असल्याने मुदत संपूनही वाळू उपसा सुरूच ठेवण्यात आलेला आहे. ‘लोकमत’ ने याबाबत स्टिंग आॅपरेशन करून वाळूचा गैरव्यवहार होत असल्याचे उघडकीस आणले होते; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तितक्या गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही. औंढा तालुक्यामध्ये पूर, जडगाव, सिद्धनाथ गांगलवाडी व पूर्णा नदीवरील चिमेगाव, भगवा, पोटा, अनखळी, अंजनवाडी, पेरजाबाद, नालेगाव या ठिकाणी वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. आजपर्यंत येथून हजारो ब्रास वाळूचा उपसा करण्यात आला. एकाच धक्क्यावर पश्चिम महाराष्ट्र पॅटर्ननुसार बोटींग, जेसीबी सक्शन पंपाच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळूंचा उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. मराठवाड्यात अशा पद्धतीने वाळूउपसा करण्याची कुठेच परवानगी दिलेली नाही. समुद्र किनारपट्ट्यांवर पाण्याची खोली जास्त असलेल्या ठिकाणीच अशा प्रकारची परवानगी प्रशासनाकडून देण्यात येत असते. अशी परवानगी नसताना वाळू माफियांकडून नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे केल्या जात आहेत. त्यामुळे नदीच्या मूळ नैसर्गिक पात्राच्या आकारामध्ये भविष्यामध्ये बदल घडून नदीकाठची गावे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)