शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

उत्खनन करा अन् विसरा; सापडलेला इतिहास मातीत! पुरातत्व विभागाचा अजब कारभार

By संतोष हिरेमठ | Updated: December 14, 2023 19:48 IST

बीबी का मकबऱ्यासमोरील अवशेषाचे रहस्य कायम, फेब्रुवारीत बीबी का मकबरा परिसरात उत्खननाचे काम करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : उत्खनन करा आणि विसरून जा. पुन्हा काही दिवसांनंतर खोदकाम करा आणि सोडून द्या, पुरातत्व विभागाचा असाच काहीसा अजब कारभार पहायला मिळत आहे. बीबी का मकबरा परिसरात दोनवेळा खोदकाम करण्यात आले. येथे पुरातत्व अवशेष सापडले. परंतु, या अवशेषांचे रहस्य कायम असून, या जागेची सध्याची अवस्था पाहता सापडलेला इतिहास पुन्हा मातीत हरविल्याची परिस्थिती आहे.

२००५ ते २००९ या कालावधीतील अधीक्षकांनी बीबी का मकबऱ्यासमोरील जागेत काही पुरातत्व अवशेष असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून खोदकाम करण्यात आले. एकदा नव्हे तर दोनदा खोदकाम करण्यात आले. या ठिकाणी पुरातत्व अवशेष सापडले खरे; परंतु या जागेची अवस्था पाहता पुरातत्व विभागाला एकाच जागेत वारंवार काम करण्यात रूची आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्खनन केलेल्या या जागेत आजघडीला मोठ्या प्रमाणात झाडीझुडपं वाढली आहेत.

केव्हा केव्हा केले उत्खनन?- भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या छत्रपती संभाजीनगर सर्कल कार्यालयाकडून १४ सप्टेंबर २०२१ रोजी मकबऱ्यासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात उत्खनन करण्यात आले होते. यातून समोरच्या भागात चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटविण्यात आला होता. तेव्हा विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले. नंतर ते अर्धवट राहिले.- त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये या ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू करण्यात आले. परंतु काही दिवसांत हे कामही थांबले. निधीअभावी काम रेंगाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आढळले?उत्खननात या ठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया आदी अवशेष आढळले होते. त्याचा आणखी उलगडा करण्याकडे आणि या जागेचे जतन करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण