शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

घाटी है तो मुमकिन है! १५५ किलो वजनाच्या महिलेचे सिझेरियन ऑपरेशन यशस्वी, जगातील ७ वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 15:48 IST

६६ बीएमआय असलेल्या व्यक्तीवर जगात आजपर्यंत केवळ ६ वेळाच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सातवी शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पाडली.

- संतोष हिरेमठ/सुमेध उघडे

औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय अर्थात घाटी रुग्णालय मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येथील स्त्री व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जानेवारीस तब्बल १५५ किलो वजन असलेल्या एका गर्भवती महिलेवरील अत्यंत गुंतागुंतीची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. माता आणि बाळ थांथानीत असून सुखरूप आहेत. विशेष म्हणजे, ६६ बीएमआय असलेल्या व्यक्तीवर जगात आजपर्यंत केवळ ६ वेळाच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सातवी शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पाडली. या यशाबद्दल संपूर्ण वैद्यकीय टीमचे कौतुक होत आहे.   घाटी रुग्णालयात एक गर्भवती महिला काही दिवसांपूर्वी महिला पथक प्रमुख डॉ. विजय कल्याणकर यांच्या पथक क्र. ३ मध्ये दाखल होऊन उपचारासाठी दाखल झाली. तिचे वजन १५५ किलो असून उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पोटाचा विकार होता. यासोबतच पहिली प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेने झाली होती. शिवाय जगात आजवर ६६ बीएमआय असलेल्या केवळ ६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे ही प्रसूती घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना हे एक आव्हानच होते. एका महिन्या पूर्वीच शस्त्रक्रियेची विशेष तयारी करण्यात आली. विशेष उपकरणे, दोन ट्रॉलीज, दोन ऑपरेशन टेबल आदींची उपलब्धता करण्यात आली. २४ जानेवारीस तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

ही शस्त्रक्रिया डॉ. श्रीनिवास एन. गडप्पा यांनी केली, त्यांना डॉ. विजय वाय. कल्याचकर, डॉ. सोनाली एस. देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रुपाली गायकवाड यांनी मदत केली. तसेच डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. सुचिता जोशी, डॉ. प्रशांत पाचोरे व डॉ. सय्यद अनिसा या भूलतज्ज्ञांनी मदत केली. तसेच दोन्ही विभागातील निवासी डॉक्टर डॉ. अमिता अकडे, डॉ. प्रतिक्षा चंदळकर, डॉ. बेताली पोडन डॉ. ऐश्वर्या एम. डॉ. हर्पीता एस. डॉ. दिती आनंद, डॉ. अपूर्वा चाटोकर, डॉ. धनश्री पाटील डॉ. ऐश्वर्या वाडे) सिस्टर्स (सुनिता अस्वले, रंजना घुगे, तृप्ती पाडळे, रिबेका खंडागळे, चंद्रकला चव्हाण, विद्या निकुंभ ) , दिपक शिराळे यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीpregnant womanगर्भवती महिला