शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

युती झाली असली तरी खैरे हेच उमेदवार हे माहिती नाही;भाजपच्या भूमिकेने युतीतील कुरबुरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 13:08 IST

युती झाली असली तरी खैरे हेच उमेदवार हे माहिती नाही; शिवसेनेच्या स्तंभपूजनावर भाजपची भूमिका 

ठळक मुद्देखैरे यांनी शिवसेना नेते म्हणून आदेश देत जि.प.मधील कॉंग्रेससोबतची युती तोडावी. जि.प.मध्ये सेना-भाजपमध्ये युती झाली तरच आम्ही निवडणुकीत मदतीसाठी पुढे

औरंगाबाद : शिवसेना-भाजपचे वरिष्ठ पातळीवर मनोमिलन झाले असले तरी मतदारसंघनिहाय मनोमिलन होण्याची चिन्हे अजून निर्माण झालेली नाहीत. युती झाली असली तरी खा. चंद्रकांत खैरे हेच युतीचे उमेदवार असल्याचे माहीत नाही, तसेच जिल्हा परिषदेत शिवसेना जोपर्यंत काँग्रेसशी युती तोडत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्यामुळे युतीतील कुरबुरी निवडणुकीत रंगत आणतील, असे दिसते आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत जल्लोषात स्तंभपूजनाचा कार्यक्रम झाला, यावेळी मात्र जल्लोष नसल्यामुळे खैरेंना हा अपशकुन तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त समर्थनगर येथे खा. चंद्रकांत खैरे यांनी सपत्नीक प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन केले. महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाला भाजपच्या एखादा वगळता सर्वांनीच दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यातच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाला फारसे महत्त्व न दिल्यामुळे अंतर्गत गटबाजीही समोर आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सेनेकडून अनेकदा फोन गेले. मात्र, कार्यक्रमस्थळी कुणीही फिरकले नसल्यामुळे भाजप खैरेंवर नाराज असल्याचे दिसले. 

भाजपची भूमिका अशी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी सांगितले, युती झाली हे आम्हाला मान्य आहे. जागा शिवसेनेला सुटेल याची आम्हाला कल्पना आहे; परंतु शिवसेनेने उमेदवार  म्हणून त्यांचे नाव जाहीर केल्याचे आम्हाला माहिती नाही. भाजपची मागणी अशी आहे, शिवसेनेने जि.प.मध्ये असलेली काँग्रेसची अभद्र युती तोडावी. तरच आम्ही त्यांना पूर्ण मदत करू. आमची कुणासोबत युती असेल तर ती युती आम्ही तात्काळ तोडू, आम्हाला वरून युतीचा आदेश आहे, आम्ही शिवसेनेचे काम करू; परंतु खैरे यांनी शिवसेना नेते म्हणून आदेश देत जि.प.मधील कॉंग्रेससोबतची युती तोडावी व भाजपसोबत युती करावी, ही आमची मागणी आहे. जि.प.मध्ये सेना-भाजपमध्ये युती झाली तरच आम्ही निवडणुकीत मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकू. 

तिघेही आले उशिरा आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे तिघेही कार्यक्रमाला उशिरा पोहोचले. खा. खैरे आल्यानंतर बऱ्याच वेळेनंतर हे तिघे आले. आ. अतुल सावे आले; परंतु तेही थोडा वेळ थांबून निघून गेले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक