... तरीही काही ठिकाणी चढे दरहिंगोली: जिल्ह्यात विविध प्रमाणपत्रे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह अनेक बाबींसाठी लागणाऱ्या मुद्रांकाची चढ्या दराने होणारी विक्री लोकमतच्या स्टिंग आॅपरेशननंतर बऱ्याचअंशी थांबली. मात्र काहींनी पुन्हा चढ्या दरानेच विक्रीचे धाडस दाखविले. हिंगोलीत आज बहुतांश विक्रेते ताळ्यावर आले होते. मात्र माणूस पाहून अधून-मधून चढ्या दरानेच विक्री होत होती. प्रशासनाच्या गाफिलीचा अनुभव, पूर्वीची लागलेली सवय किंवा चटक म्हणून की काय शंभर रुपयांचा मुद्रांक आहे त्या किमतीत द्यायला त्यांचे मनच धजावत नसल्याचे एकंदर चित्र अशा ठिकाणी होते. मात्र अनेकांनी नको ती झझंट म्हणून अधिकचे दर घेण्याचे टाळले. काहींनी तर या दरात परवडतच नाही. म्हणून स्वखुशीने काय अधिकचे द्यायचे ते ठरवा, असे गोडीगुलाबीने घेतले. सेनगावात स्टिंग आॅपरेशनमुळे मुद्रांक विक्रेत्यांना धक्का बसला. त्यातच लोकमतचे वृत्त वाचल्यानंतर अनेकांनी आज विक्रेत्यांशी वाद घालून आहे त्या दरात मुद्रांक द्यायला भाग पाडले. औंढ्यातही बऱ्याच अंशी सुधारणा पहायला मिळाली.(जिल्हा प्रतिनिधी)
... तरीही काही ठिकाणी चढे दर
By admin | Updated: August 14, 2014 02:07 IST