शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

२ महिन्यांसाठी दिलेलं निवडणूक कामही जमले नाही, पोलिस कर्मचारी तत्काळ निलंबित

By सुमित डोळे | Updated: April 25, 2024 19:31 IST

वरिष्ठांना काहीही न कळवता पोलिस कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित

छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करूनही कामावर हजर न झाल्याबद्दल जिल्हा पोलिस दलातील पाेलिस नाईक साहेबराव बाबुराव इखारेला निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी मंगळवारी रात्री उशिरा याबाबत तडकाफडकी आदेश जारी करत अन्य कर्मचारी, अधिकाऱ्यांनादेखील निवडणुकीच्या कामात कसूर केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

पोलिस अधीक्षक कलवानीया यांनी नुकताच जिल्ह्यातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत ठाणे प्रभारींना आवश्यक सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने निवडणूक कामासाठी नियुक्ती कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वर्तन पारदर्शक राहुन कामात सजगता राहावी, अशा सक्त सूचनाच त्यांनी केल्या. शिवाय, प्रशासकीय पातळीवरदेखील आवश्यक बंदोबस्ताची मागणी केली असून लवकरच बंदोबस्तासाठी सुरक्षा यंत्रणांचे पुरेसे मनुष्यबळ मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हयगय चालणार नाहीजिल्हा पोलिस दलाच्या दंगा काबू पथकातील पोलिस नाईक साहेबराव इखारेला वैजापूर येथील निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठांना काहीही न कळवता तो कर्तव्यावर अनुपस्थित राहिला. ही बाब निदर्शनास येताच कलवानीया यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. इखारेला सप्टेंबर, २०२३ मध्येदेखील निलंबित केले असून गंभीर गुन्हेदेखील दाखल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४