शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एक विद्यार्थी आला तरी तासिका घ्या; कुलगुरु विजय फुलारी यांची प्राचार्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:54 IST

प्राचार्यांनी प्रत्येक महिन्यास विद्यार्थ्यांच्या हजेरीचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविणे बंधनकारक असेल.

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयात नियमित तासिका होतात की नाही याची पाहणी करण्यासाठी ‘सरप्राइज व्हिजिट’ देण्यात येतील. त्यामुळे एक जरी विद्यार्थी आला तरी तासिका घेतलीच पाहिजे. प्राचार्यांनी प्रत्येक महिन्यास विद्यार्थ्यांच्या हजेरीचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविणे बंधनकारक असेल. या नियमांचे पालन न करणाऱ्या प्राचार्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी तंबी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी प्राचार्यांच्या बैठकीत दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारी (दि. १६) सुरुवात झाली. कुलगुरु डॉ. फुलारी यांनी दुसऱ्याच दिवशी विद्यापीठ नाट्यगृहात मंगळवारी प्राचार्यांची सहविचार सभा घेतली. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती. कुलगुरु म्हणाले, अकॅडमिक कॅलेंडरचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. कॉलेजनिहाय प्रवेश समिती स्थापन करावी, तसेच ३० जूनपूर्वी तासिकांचे नियोजन करण्यात यावे. हे वेळापत्रक विद्यापीठाला पाठवावे. २०२७ मध्ये विद्यापीठ ‘क्यूएस रँकिंग’ला सामोरे जाणार आहे. त्यामुळे हे बदल अपेक्षित आहेत. प्र-कुलगुरु डॉ. वाल्मीक सरवदे यांनी प्रास्ताविक केले. संलग्नित महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही तसेच तासिका तत्त्वावरील भरतीसाठीदेखील विद्यापीठाची परवानगी लागेल. संचालन कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. प्राचार्यांच्या सभेसाठी पहिल्यांदाच नाट्यगृह खचाखच भरले.

कुलगुरुंनी मांडलेले मुद्दे- महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘कॅस’ विद्यापीठात होणार.- ‘नॅक’ची नवीन नियमावली समजून घेण्यासाठी जिल्हानिहाय कार्यशाळा.- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी प्रत्येकी ५० हजार व १ लाखांचे अनुदान.- युवामहोत्सव, ‘आविष्कार’चे जिल्हानिहाय आयोजन.- अनुदानित व विनाअनुदानित असा सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांना ‘आदर्श’ पुरस्कार.- युवामहोत्सवात किमान तीन प्रकारांत सहभाग घेणे बंधनकारक.- एकदा जाहीर केलेली दंड माफी कमी करणार नाही. विद्यापीठात कुठे अडवणूक झाल्यास, कामे होत नसल्यास प्राचार्यांना थेट कुलगुरुंना भेटता येईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र