शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपला तरीही अतिक्रमणे जशास तशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:31 IST

पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत, असे एका शासकीय परिपत्रकाचा आधार घेत महापालिका मागील चार महिन्यांपासून जबाबदारी झटकून टाकते. आता पावसाळा संपला तरी नाल्यातील अतिक्रमणांसह रस्त्यांवर जिकडे तिकडे झालेली अतिक्रमणे काढण्यास प्रशासन तयार नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर सायंकाळी औरंगाबादकरांना दुचाकी नेणे कठीण झाले आहे. जुन्या शहरात अधिक यातना सहन कराव्या लागत आहेत.महापालिका प्रशासनाचे शहरात अजिबात ‘भय’उरलेले नाही. ज्याच्या मनात येईल तो तिथे अतिक्रमण करून मोकळा होतो. रस्त्यावर, नाल्यात अतिक्रमण का केले असा जाबही पालिकेच्या प्रशासकीय विभागातर्फे विचारण्यात येत नाही. उलट या अतिक्रमणाला ‘कायदेशीर’संरक्षण कसे मिळवून देता येईल, यादृष्टीने अधिकारी व कर्मचारी ‘काम’करतात. अतिक्रमण हटाव विभागाकडे ३६५ दिवसांमध्ये तब्बल १२०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील १०० तक्रारींचेदेखील निरसन होत नाही. आकड्यांकडे लक्ष घातले असता महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग नेमका करतो तरी काय हा प्रश्न निर्माण होतो.गतमहिन्यात शहरातील विविध भागांत नाल्यांमधील अतिक्रमणांचे काय परिणाम होत आहेत याची प्रचीती औरंगाबादकरांना आली. नाल्यातील अतिक्रमणे काढा, यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांनीही तीन दिवसांमध्ये अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिले. आता ३० दिवस होत आले तरी अतिक्रमणे जशास तशी आहेत.