शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांचा धुव्वा

By admin | Updated: April 3, 2017 22:44 IST

दगीरअत्यंत रंगतदार ठरलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली हुकूमत पुन्हा कायम राखत चौखुर उधळलेला पालकमंत्र्यांचा वारु काँग्रेसने उदगीरात अडविला़

चेतन धनुरे उदगीरअत्यंत रंगतदार ठरलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली हुकूमत पुन्हा कायम राखत चौखुर उधळलेला पालकमंत्र्यांचा वारु काँग्रेसने उदगीरात अडविला़ १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकत काँग्रेस प्रणित पॅनलने बाजार समितीवर आपला झेंडा रोवला. पदरी पडलेल्या सलगच्या पराभवानंतर मिळालेले हे यश काँग्रेससाठी जणू ‘ओयासिस’च ठरले़ तर पालकमंत्री संभाजीराव पाटील तसेच आमदार सुधाकर भालेराव यांच्यासाठी हा धक्का ठरला़उदगीर कृउबाच्या संचालक मंडळासाठी रविवारी तब्बल ९५ टक्के मतदान झाले़ सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली़ तेव्हा भाजप प्रणित पॅनलचे व्यापारी मतदारसंघातील सचिन हुडे वगळता अन्य सर्व जागांवर काँग्रेस प्रणित पॅनलचे उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतली. तेव्हाच चित्र स्पष्ट झाले होते़ या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून काँग्रेस प्रणित पॅनलचे सर्व ७ उमेदवार विजयी झाले़ धनाजी जाधव (४१७ मते), सुभाष धनुरे (४१०), कल्याण पाटील (४४२), रमेश पाटील (४०२), शिरीषकुमार पाटील (३८९), गजानन बिरादार (३८३) व रामराव बिरादार ३९० मते घेऊन विजयी ठरले़ सोसायटी महिला गटातून काँग्रेस प्रणित पॅनलच्याच गंगुबाई श्रीमंडळे ४०२ तर चंचलाबाई लोहकरे ४३६ मते घेऊन विजयी झाल्या़ सोसायटी इतर मागासवर्गीय गटातून पद्माकर उगिले ४१३ मते घेऊन विजयी झाले़ सोसायटी विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून संजीव पवार ३५३ मते घेऊन विजयी झाले़ ग्रा.पं.च्या सर्वसाधारण गटातून सिद्धेश्वर पाटील ४९३ तर संतोष बिरादार यांनी ४१५ मते घेत विजयाला गवसणी घातली़ ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून ३७३ मते घेत मोहन गडीकर यांनी विजय मिळविला़ ग्रा.पं. आर्थिक दुर्बल घटकातून अनिल लांजे यांनी ४०७, हमाल मापारी मतदारसंघातून गौतम पिंपरे १९८, व्यापारी मतदारसंघातून कैलास पाटील ६०४ मते घेऊन विजयी झाले़ तर एकमेव जागा पदरात पडलेल्या भाजप प्रणित पॅनलचे सचिन हुडे हे विक्रमी ८५१ मतांनी विजयी झाले़ निकाल जाहीर होताच काँग्रेसने जल्लोष साजरा केला.