शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये गळा आवळून पँथरचे शहराध्यक्ष असलेल्या उद्योजकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:52 IST

मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देचिकलठाणा ठाण्यात नोंद : शेंद्रा पंचतारांकित वसाहतीत कंपनीसमोरील घटना

औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.प्रकाश कडूबा कासारे (४८, रा. मुकुंदवाडी), असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, कासारे यांची शेंद्रा एमआयडीसीमध्ये तुषार इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती अनेक वर्षांपासून बंद आहे. भारतीय दलित पँथरचे ते औरंगाबाद शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. मात्र रात्री घरी परतले नव्हते. नातेवाईक सतत त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते; मात्र फोन लागत नव्हता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कंपनीजवळ उभ्या कारच्या ड्रायव्हर सीटवर कासारे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तेव्हा कासारे यांचा गळा आवळल्यासारखे दिसत होते. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.हॉटेलमध्ये झाले एकासोबत भांडणकासारे हे रविवारी सायंकाळी शेंद्रा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये एका जणासोबत गेले होते. तेथे सोबतच्या एका व्यक्तीसोबत त्यांचे जोरदार भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र त्यांच्यासोबत भांडण करणारा कोण, हे कळू शकले नाही. ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला.कार्यकर्त्यांची घाटीत गर्दीकासारे हे दलित पँथरचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच विविध नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घाटीत धाव घेतली.सुरक्षारक्षकावर संशयतुषार इंजिनिअरिंग कंपनीच्या सुरक्षेसाठी कासारे यांनी एक सुरक्षारक्षक नेमला होता. हा सुरक्षारक्षक सहकुटुंब कंपनीत राहतो. घटना घडल्यापासून तो गायब आहे. त्याच्यावरही पोलिसांना संशय आहे.अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय?पोलीस सूत्रांनी सांगितले की, कासारे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्यांचा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.