उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी दुपारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात बरसलेल्या पावसाची शासनदफ्तरी सरासरी १२़७८ मिमीची नोंद झाली आहे़ तर सोमवारी दुपारीही उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली़ सर्वांसाठी दिलासादायक पाऊस झाला असला तरी पेरणीसाठी लागणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे़चालू वर्षी पावसाने मोठी ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत़ तर ग्रामीणसह शहरी भागातही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत़पाऊस पडावा, यासाठी प्रत्येकजण देवाकडे साकडे घालत असल्याचे चित्र यंदाही दिसून येत होते़ जिल्हावासियांचे लक्ष लागलेल्या वरूणराजाने रविवारी जोरदार आगमन केले़ उस्मानाबादेत आठवडी बाजार असल्याने काही अंशी नागरिकांची हेळसांड झाली असली तरी पाऊस आल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते़ विशेषत: भूम, कळंब व वाशी तालुक्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली़ यात मंडळनिहाय पावसाची आकडेवारी पाहता (आकडेवारी मिलीमीटरमध्ये) उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद मंडळांतर्गत उस्मानाबाद शहर १६़२, ग्रामीण- १७़५०, ढोकी- १०, तेर - ५, पाडोळी ९, जागजी-११ तर बेंबळी व केशेगाव मंडळात प्रत्येक ५ मिमी पाऊस झाला़ लोहारा तालुक्यातील लोहारा-०६, जेवळी १३, माकणी- ०, परंडा तालुक्यातील परंडा येथे १०, सोनारी-१०, आनाळा-८, जवळा २६, आसू मंडळांतर्गत ५ मिमी पाऊस झाला़ भूम तालुक्यातील भूम - ५९, ईट येथे-०४, अंबी-०६, वालवड ७, माणकेश्वर येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली़ कळंब तालुक्यात कळंब ४७़०, ईटकूर-५, शिराढोण ३१, येरमाळा- १५, मोहा- ११, गोविंदपूर- २४, वाशी तालुक्यात वाशी २२, तेरखेडा- १५, पारगाव- १७, तुळजापूर तालुक्यात तुळजापूर- २१, जळकोट-०, नळदुर्ग-४, मंगरूळ-१८, सलगरा-१, सावरगाव-८, उमरगा तालुक्यात उमरगा शहर-९, मुरूम-६, नारंगवाडी-२, दाळींब-४ इतर तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ रविवार पाठोपाठ सोमवारीही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी लागणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे़ (प्रतिनिधी)गेल्या चोवीस तासात झालेला व एकूण तालुकानिहाय पाऊसतालुकाआजचा पाऊसएकूण पाऊसउस्मानाबाद९.६०५०तुळजापूर७.४०४५.३उमरगा४.२०४६.८लोहारा६.३०६२.७भूम२२.४०५३.४कळंब२२.१०५१.६परंडा१२.२०५७.२वाशी१८.००५२.७एकूण१२.७८५२.४५वीज गुलभूम तालुक्यातील ईट व परिसरात रविवारी दुपारी, रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ वादळी वाऱ्यात बरसलेल्या पावसामुळे ईटसह परिसरातील जवळपास १० ते १५ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला़ जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती होती़
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By admin | Updated: July 8, 2014 00:59 IST