शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सखी मतदान केंद्रांवर दिसला आगळा उत्साह; आगळावेगळ्या प्रयोगाचे होत आहे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 15:25 IST

महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम 

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : महिलांची मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महिला मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी यावर्षी प्रथमच सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आले होते. महिला व्यवस्थापित मतदान केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या सखी मतदान केंद्रांवरचे वातावरण दिवसभर उत्साहपूर्ण आणि नावीन्याने भरलेले दिसून आले.

औरंगाबाद मतदारसंघात एकूण १२ सखी मतदान केंद्रे होती. यापैकी ४ केंद्रे शहरात, तर उर्वरित तालुक्याच्या ठिकाणी होती. आयशा मोतीवाला इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळा, टाइम्स कॉलनी, आझाद मुलींचे महाविद्यालय नवखंडा ज्युबिलीपार्क, चाटे स्कूल सातारा परिसर, महाराष्ट्र पब्लिक स्कूल ही शहरातील चार केंद्रे सखी मतदान केंद्रे होती.गुलाबी कमान लावून ही मतदान केंद्रे सजविण्यात आली होती. या कमानीवर लावण्यात आलेली ‘मी मतदान करणारच’ अशी घोषवाक्ये महिला मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत होती. सखी मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, सहायक सर्वच महिला होत्या. सखी केंद्रांवर महिला पोलिसांचीच नियुक्ती करण्यात यावी, असे अपेक्षित होते. मात्र, औरंगाबाद शहरात सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील ठिकाणांवरच्या सखी मतदान केंद्रावर महिला पोलिसांऐवजी पुरुष पोलीस पहारा देत असल्याचे दिसून आले. 

उत्तम व्यवस्था संपूर्णपणे ‘महिला राज’ असणाऱ्या सखी मतदान केंद्रावरील सर्व व्यवस्था अत्यंत चोख असून, सर्व काही शिस्तीत होत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग पहिल्यांदाच केल्यामुळे याबाबत कुतूहल होतेच आणि महिला एखादे मतदान केंद्र कसे चालवितात याची उत्सुकताही होती. आतील सर्व कारभार पाहून या महिलांचे कौतुक वाटत आहे, अशी प्रतिक्रिया सखी मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या अनेक महिला मतदारांनी दिली. 

महिला सशक्तीकरणाचा प्रयत्नसखी मतदान केंद्राचे काम खूप चांगले वाटले. छान अनुभव होता. सगळी व्यवस्था उत्तम आहे. महिला अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळाले. आलेल्या लोकांना महिला कर्मचारी ज्या पद्धतीने सहकार्य करतात ते खूपच उल्लेखनीय आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पडलेले हे आणखी एक पाऊल आहे, असे वाटते.     -सरोज बलदवा

महिलांची जागरूकता वाढेलयावर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेले सखी मतदान केंद्र ही अतिशय चांगली संकल्पना आहे. निश्चितच यातून महिलांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल. औरंगाबाद हे माझे माहेर असून, मी येथे खास मतदानासाठी आले आहे. या प्रयोगामुळे मतदानाच्या बाबतीत महिला अधिकाधिक जागरूक होतील, असे वाटते. मतदानावेळी दिसून येणारे गंभीर वातावरण येथे नसून, सखी मतदान केंद्रावर अत्यंत उत्साह दिसून येत आहे.-डॉ. माधुरी मोहिते

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019