शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढविलेल्या जागा तासातच रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशांचा गोंधळ स्पॉट अडमिशनच्या शेवटच्या दिवशीही कायम होता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशांचा गोंधळ स्पॉट अडमिशनच्या शेवटच्या दिवशीही कायम होता. बुधवारी सायंकाळी ६ वाजता पदव्युत्तरच्या २० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तासाभरातच रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सतत नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. प्रवेश फेºयांना सुरुवात झाल्यापासून प्रत्येक दिवशी प्रवेशाविषयी नवीन निर्णय होत आहे. हा सिलसिला अगदी स्पॉट अ‍ॅडमिशनच्या शेवटच्या दिवशीही कायम राहिला. बुधवारी सायंकाळी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या सहीने विद्यापीठ विभाग आणि उपपरिसरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सरासरी २० टक्के जागा वाढविण्यात येत आहेत. त्या जागा गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्पॉट अ‍ॅडमिशनमध्ये भरण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर तासाभरात सर्व विभागप्रमुखांना एसएमएसद्वारे संदेश पाठवत जागावाढीचे काढण्यात आलेले पत्र पुढील आदेश येईपर्यंत रद्द केल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला. याविषयी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.