शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

अभियांत्रिकीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल; परळीच्या महाविद्यालयातून फोडल्याचा संशय

By राम शिनगारे | Updated: May 28, 2024 18:54 IST

विद्यापीठाने महाविद्यालयाकडून मागवला अहवाल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. सिव्हिल अभियांत्रिकीच्या टाऊन प्लॅनिंग विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होताच साेशल मीडियात सोमवारी सकाळी व्हायरल झाली. ही प्रश्नपत्रिका परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयातून व्हायरल झाल्याचा दावा केला जात असून, परीक्षा विभागाने महाविद्यालयाकडून याप्रकरणी अहवाल मागविला असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.

विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील आयसीम, एव्हरेस्ट आणि परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अंबाजोगाईतील टी.बी. गिरवलकर महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा समावेश आहे. सोमवारी सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात होताच सिव्हिल अभियांत्रिकीचा टाऊन प्लॅनिंग हा तृतीय वर्षाच्या पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मीडियात व्हायरल झाली. या पेपरची १०७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सोशल मीडियात व्हायरल प्रश्नपत्रिकेवर १०.११ वाजेची वेळ नोंदवली आहे. ही प्रश्नपत्रिका परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात सुरू असलेल्या केंद्रातून फुटली असल्याचा दावा सूत्रांनी केला. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि बैठ्या पथक प्रमुखांकडून तात्काळ अहवाल मागविण्यात आल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली, तसेच पेपर फुटल्याची कोणीही लेखी तक्रार केली नसून, पेपर सुरू होण्यापूर्वीही कुठल्याही केंद्रावरून पेपर फुटला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

...त्यामुळेच झाली होती कारवाईवैद्यनाथ महाविद्यालयात नागनाथआअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. हालगे महाविद्यालयात मागील परीक्षेवेळी थेट मोबाइल समोर ठेवूनच विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहीत होते. हा प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच केंद्रातून प्रश्नपत्रिकाही फोडण्यात आली. त्यामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ते केंद्र बदलून वैद्यनाथ महाविद्यालयात दिले होते. काही दिवसांपूर्वीच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हालगे महाविद्यालयावर परीक्षेसाठी तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे.

प्रसारमाध्यमांकडूनच कळलेसंबंधित व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका ही बाकड्यांवर ठेवून काढलेली आहे. आमच्या कॉलेजमधून परीक्षा सुरू होण्यापूर्वी कोणतीही प्रश्नपत्रिका व्हायरल झालेली नाही. त्यामुळे हा प्रकार कोणी तरी खोडसाळपणे केलेला असावा. मात्र, आमच्या महाविद्यालयात कोणताही गैरप्रकार झालेला नाही.- डॉ. समीर रेणुकादास, केंद्रप्रमुख, वैद्यनाथ महाविद्यालय, परळी

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादexamपरीक्षाBeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र