औरंगाबाद : बेरोजगारीला कंटाळून एका तरुण अभियंत्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना छावणीतील रेल्वे ओव्हरब्रीज ते दौलताबाददरम्यान रेल्वेरुळावर शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लक्ष्मण जगन्नाथ गायकवाड (२३, रा.पीराचे बाभूळगाव, ता. वैजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मणने देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासून तो नोकरीच्या शोधात होता, मात्र त्यास नोकरी न मिळाल्याने नाराज होता. गेल्या काही दिवसांपासून तो गावाकडे राहण्यास गेला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता तो गावाकडून औरंगाबादला जातो, असे वडिलांना सांगून निघाला आणि दुपारी त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा तपास पोलीस नाईक बबन शिंदे करीत आहे.
बेरोजगारीला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:21 IST