शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

एकाच संस्थेवर अभियंत्यांची मेहेरनजर

By admin | Updated: November 18, 2015 00:37 IST

गंगाराम आढाव , जालना सार्वजनिक बांधकाम विभागातील अजब कारभाराचा सर्वाधिक फटका हा इमाने इतबारे काम करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. ज्यांनी कामे केली

गंगाराम आढाव , जालनासार्वजनिक बांधकाम विभागातील अजब कारभाराचा सर्वाधिक फटका हा इमाने इतबारे काम करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. ज्यांनी कामे केली त्यांच्याच कामात तांत्रिक त्रुटी काढण्यात येऊन देयके रखडून ठेवली जात आहे. ज्यांनी काम न करता, तसेच शिफारशी पत्रापेक्षा अधिकचे देयके सादर केली अशांची मात्र बिनदिक्कतपणे बिले काढण्यात येत असल्याची चर्चा आहे. दरम्यान बिलांमध्ये संबंधित अभियंत्यांची हिस्सेदारी असल्यामुळे शिफारस पत्रावरील रकमेच्या चारपटीने रक्कम टाकून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी एकाच संस्थेवर मेहरनजर दाखविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल पाचपट अधिकचे वर्कआर्डर हे एकाच संस्थेला दिले. शंकर पार्वती मजूर सहकारी संस्था म. जालना असे या संस्थेचे नाव असून, या संस्थेवरच एवढी मेहरबानी का दाखविण्यात आली. याप्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, संबंधित अभियंत्यांनी त्या कामांमध्ये हिस्सेदारी असल्यामुळेच पाचपटीने कामांच्या रकमा वाढवून सुमारे ७५ लाखांची तफावत करून ती रक्कमेचा बोजा शासनाच्या तिजोरीवर टाकला असल्याची चर्चा आहे.शंकरपार्वती या मजूर सहकारी संस्थेवर मेहरबान होऊन जालना सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी तसेच इतर अधिकाऱ्यांनी मनमानीपणे कामांच्या रकमा वाढविल्या आहेत. २ लाखांच्या कामांसाठी ९ लाख ९८ हजार ३० रूपयांचे वर्कआॅर्डर देण्यात आले. अशा प्रमाणे एकूण २५ लाख ३९ हजार खर्चाच्या दहा कामांची एकूण शिफारस रकम असताना त्यात चार ते पाचपट रक्कम वाढवून एकूण ९९ लाख ७३ हजार १५८ रूपयांच्या कामांचे वर्कआॅर्डर दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पडताळणीत हे सर्व स्पष्ट होऊन तसा अहवाल कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता तसेच मुख्य अभियंता औरंगाबाद यांच्याकडे जाऊन ही त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अभियंते व इतर अधिकाऱ्यांचे या कामांत संगनमत असल्याचे असल्याचे दिसून येत आहे. याकामांची सखोल चौकशी करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.जालना सार्वजनिक बांधकाम विभागाने शंकर पार्वती मजूर संस्थेला मिळालेल्या शिफारस पत्रावरून चार ते पट अधिकची रक्कम वाढवून वर्कआॅर्डर तर दिले. शिवाय इतर म्हणजे जयकिसान मजूर सहकारी संस्था, पिरपिंपळगाव या संस्थेला मिळालेले नर्सिंग कॉलेज दुरूस्तीचे ५ लाखांचे शिफारस पत्रावर १० लाखांचे व महिला रूग्णालयातील सेनेटरी अ‍ॅरेजमेंट कामांचे ४ लाखांऐवजी ९ लाख ९९ हजार ५० रूपयांचे वर्कआॅर्डर देवून ते काम जयकिसान या संस्थेला न देता कामांचे वाढीव वर्कआॅर्डर शंकरपार्वती संस्थेला देण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे.