शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’च्या जमीन संपादनाची प्रतीक्षा संपेना

By admin | Updated: April 30, 2017 23:59 IST

उस्मानाबाद वडगाव (सि़) येथील एमआयडीसीसाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठी प्रती एकरी १५ लाख रूपये दर निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़

विजय मुंडे  उस्मानाबादतत्कालीन शासनाने भूम, कळंब व शिराढोण येथे औद्यागिक वसात सुरू करण्याबाबतचे पत्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले होते़ त्यानुसार भू- निवड समितीने पाहणी करून प्रस्ताव दाखल केला होता़ मात्र, उच्चाधिकार समितीच्या ३० डिसेंबर २०१३ च्या बैठकीत यावर चर्चा होऊन या प्रस्तावाला सद्यस्थितीत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ तर वडगाव (सि़) येथील एमआयडीसीसाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठी प्रती एकरी १५ लाख रूपये दर २२ फेब्रुवारी २०१७ च्या बैठकित निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़उस्मानाबाद शहरासह भूम, उमरगा व कळंब येथील एमआयडीसीत काही छोटे उद्योग सुरू आहेत़ येथील उद्योगामुळे काही मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे़ मात्र, बहुतांश भूखंडावर अद्यापही उद्योग सुरू झालेले नाहीत़ एकीकडे जिल्ह्यातील एमआयडीसीत मोठे उद्योग सुरू झालेले नाहीत़ तर दुसरीकडे तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी आ़ राणाजगजितसिंह पाटील, आ़ राहूल मोठे यांच्या पाठपुराव्यामुळे कळंब तालुक्यातील शिराढोण, तुळजापूर व भूम येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार भू- निवड समितीने प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची १९ डिसेंबर २०१३ मध्ये पाहणी केली होती़त्यानुसार शिराढोण येथे ९६७़४१ हे़आऱ खासगी क्षेत्र भूसंपादनाचा प्रस्ताव मुख्यालयास सादर केला होता़ तर ६ डिसेंबर २०१३ रोजी तुळजापूर येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून ४४३़६८ हे़आऱ जमीन संपादनाचा व प्रस्तावित अति़ भूम औद्योगिक क्षेत्रासाठी ६ डिसेंबर २०१३ रोजी भूम येथील क्षेत्राची पाहणी करून ३५७़३० हे़आऱ जमीन संपादनाचा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर केला आहे़ उच्चाधिकार समितीच्या ७६ व्या बैठकीत या तिन्ही प्रस्तावांवर चर्चा केल्यानंतर सद्यस्थितीत प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानंतर या प्रस्तावांवर पुढील कार्यवाही झाल्याचे दिसत नाही़ उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि़) येथील आद्योगक क्षेत्र स्थापन करण्यासाठी खासगी १४८़५३ हे़आऱ क्षेत्र संपादीत करण्यात येणार आहे़ भूसंपादनासाठी शेतकरी व प्रशासनाच्या अनेक बैठका झाल्या असून, दरावरून प्रश्न रेंगाळला आहे़ ८९ व्या उच्चाधिकार समितीच्या २२ फेब्रुवारी २०१७ च्या बैठकीत प्रती एकरी १५ लाख रूपयांच्या दरा समितीने मंजुरी दिली आहे़ शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर भूसंपादनाची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे़