कळंब : शहरातील आठवडी बाजार मैदानावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम मंगळवारी नगर परिषद प्रशासनाने हाती घेतली होती. काही राजकीय मंडळींनी या अतिक्रमणधारकांचा कैवार घेतल्याने ही मोहीम अर्ध्यावर गुंडाळावी लागली. शहरातील नवीन बसस्थानकाशेजारील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. यामुळे या भागात अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, तसेच इतरही अवैध धंदे या अतिक्रमणाच्या आडून चालू आहेत. पालिका प्रशासनाने येथील अतिक्रमणे दूर करून शेतकरी, लहान व्यापाऱ्यांसाठी जागा रिकामी करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली होती. मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी आठवडी बाजार परिसरात सर्व सामग्रीसह अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली. या ठिकाणी अनधिकृतपणे मासे विक्री करणाऱ्यांनीही दुकाने थाटली होती. त्यामुळे त्यांनाही हटविण्याची कार्यवाही नगर परिषद प्रशासनाने सुरू केली. परंतु, ही मोहीम चालू अतसानाच काही राजकीय मंडळींनी या मोहिमेला विरोध सुरू केला. सध्या दुष्काळाचे वातावरण असून, गरीबांच्या पोटावर पाय देऊ नका, अशी भूमिका सदरील राजकीय मंडळीने घेतली आहे. (वार्ताहर)
‘अतिक्रमण हटाव’ अर्ध्यात गुंडाळले
By admin | Updated: July 30, 2015 00:44 IST