नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गात सर्वत्र अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करण्यासाठी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, जि. प. प्रशासन व पोलिस कर्मचाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबविली.नर्सी येथे मंदिर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी संत नामदेव संस्थान, ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जि. प. प्रशासनाकडे लेखी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार २० जुलै रोजी सकाळी ९ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आदमाने, जवळेकर, जि. प. चे पदमणे व कर्मचारी, महसूल विभागाचे नायब तहसीलदार सचिन जैस्वाल, मंडळ अधिकारी मनोहर खंदारे, तलाठी आर. एस. इनामदार, आर. एल. वाडेकर यांचे संयुक्त पथक गावात दाखल झाले. सर्वप्रथम दवंडी देऊन अतिक्रमण काढण्याची सर्वांना सूचना देण्यात आली. त्यावर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवला होता. पक्के बांधकाम केलेल्यांनी चार दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा जेसीबीद्वारे अतिक्रमण काढण्यात येईल, असे नायब तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी केले. (वार्ताहर)
संयुक्त कारवाईद्वारे अतिक्रमण हटविले
By admin | Updated: July 22, 2014 00:19 IST