शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दिवाळीनंतर पाडापाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:43 IST

शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि नाल्यांमधील झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पावसाळा संपला तरी अतिक्रमणे जशास तशी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासन दिवाळीनंतर शहरात पाडापाडी मोहीम हाती घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि नाल्यांमधील झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पावसाळा संपला तरी अतिक्रमणे जशास तशी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासन दिवाळीनंतर शहरात पाडापाडी मोहीम हाती घेणार आहे.मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी अतिक्रमण हटाव पथकाला पाडापाडीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहे.मागील महिन्यात शहरात झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडाली होती. नाल्याचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले होते. जयभवानीनगरातून वाहणाºया नाल्यावरच १३५ जणांनी बांधकामे केली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. भारतनगर, गजानननगर, मयूरनगर, सूतगिरणी चौक, नूर कॉलनी, मयूर पार्क, पुंडलिकनगर, हनुमाननगर, गुरुगोविंदसिंगपुरा, सिडको एन-४, सह अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. शहराच्या ६८ वसाहतींमध्ये पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या होत्या. जयभवानीनगरातील नाल्यावरील बांधकामे तातडीने हटविण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. मागील सर्वसाधारण सभेत प्रशासनातर्फे अतिक्रमणे तीन दिवसांमध्ये काढण्याचे आश्वासनही नगरसेवकांना दिले होते. ‘लोकमत’ने शहराच्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांसह नाल्यांचा प्रश्नही उपस्थित केला होता. यानंतर मनपा प्रशासनाने सोमवारी नवरात्रोत्सव आणि १०० कोटी रस्त्यांच्या निविदा काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असून, दिवाळीनंतर पाडापाडीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.बीड बायपास रोड २०० मीटर रुंद करण्यासाठी मनपाने कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बाधित मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मार्किंग करण्यात आली. तसेच मालमत्ताधारकांची सुनावणीही घेण्यात आली. या रस्त्यावरील १३७ मालमत्ताधारकांचे नियमानुसार भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन करताना मोबदला द्यावा लागणार असल्याने मनपाची अडचण झाली आहे.महापालिका मालमत्ताधारकांसमोर टीडीआर आणि एफएसआय घ्या असे दोनच पर्याय ठेवणार आहे. रोख रक्कम अथवा बाजार दरानुसार मोबदला देण्याचा तिसरा पर्याय मनपाकडे उपलब्ध नाही.